शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दादा, तुम्ही आता मुख्यमंत्री व्हा!

By admin | Updated: May 23, 2016 01:02 IST

हसन मुश्रीफ यांचा टोला : दिल्या उपहासात्मक शुभेच्छा; कोल्हापूरला मिळेल पहिला मान

कोल्हापूर : शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर सरकार स्थिर राहील, अशी व्यवस्था आपण व मुख्यमंत्र्यांनी केल्याचे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. त्यामुळे यदाकदाचित मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आलीच तर चंद्रकांतदादा मुख्यमंत्री होतील. त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत, असा उपहासात्मक टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला. गारगोटी येथील कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘हसन मुश्रीफ कागलमधून पुन्हा आमदार होणार नाहीत, याची पूर्ण तयारी केल्या’चे वक्तव्य केले होते. चंद्रकांतदादा पाटील यांच्या या वक्तव्याचा हसन मुश्रीफ यांनी रविवारी समाचार घेतला. ते म्हणाले, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे हे वक्तव्य वाचून आपण अचंबित झालो. जरी शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला तरी आपण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे सरकार स्थिर राहील, याची व्यवस्था केल्याचे मंत्री पाटील यांचे वक्तव्य पाहता ते मुख्यमंत्र्यांच्या फारच जवळ गेले आहेत. यदाकदाचित मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आली तर दादा निश्चित मुख्यमंत्री होतील. दादांच्या रूपाने कोल्हापूरला पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळणार असल्याने आम्हाला आनंद होईल. यासाठी दादांना शुभेच्छा देतो, असा टोला हाणत विधानसभा निवडणुकीसाठी अजून साडेतीन वर्षांचा कालावधी आहे. तत्पूर्वी, पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याचा सूचक इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा सूचक इशारा कागलमधून आपणाला पुन्हा आमदार होऊ द्यायचे नाही, असा चंग चंद्रकांतदादांनी बांधला आहे; पण विधानसभेपूर्वी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे, असा सूचक इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिला.