शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

दाभिल, इटे रास्त धान्यचा परवाना रद्द

By admin | Updated: February 25, 2015 00:39 IST

८५ दिवस आंदोलन : शेवटी मुक्ती संघर्ष समितीस मिळाले यश

आजरा : दाभिल (ता. आजरा) येथील रास्त धान्य दुकान परवानाधारक जयश्री विठोबा यादव यांचा रास्त भाव धान्य दुकान परवाना व केरोसीन परवाना मुक्ती संघर्ष समितीने ८५ दिवसांचे ठिय्या आंदोलन केल्यानंतर अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे, तर असाच आदेश इटे (ता. आजरा) येथील मंगल शिवाजी कांबळे यांना देण्यात आल्याने इटे ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.दाभिल येथील रास्त भाव धान्य दुकान परवानाधारक जयश्री यादव यांच्याकडून होणाऱ्या धान्य व रॉकेलवाटपात त्रुटी आहेत. शिधापत्रिकाधारकांना योग्य वागणूक मिळत नाही असा आरोप करीत परवाना रद्द करण्यासंदर्भात गेले दीड वर्ष ग्रामस्थांकडून आंदोलन सुरू होते. याबाबत मुक्ती संघर्ष समितीने आक्रमक होत २ डिसेंबरपासून आजरा तहसीलसमोर ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला होता. सलग ८५ दिवस हे आंदोलन सुरू होते. आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून चार दिवसांचे उपोषण संग्राम सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.तालुका पुरवठा अधिकारी, तहसीलदार उपविभागीय अधिकारी व आयुक्त असा कागदी फायलींचा प्रवास सुरू होता. अखेर या विषयावर बराच काथ्याकुट झाला. अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले दुकान तपासणीचे आदेश गांभीर्याने घेत रास्त भाव धान्य दुकानासह केरोसीन वाटप परवाना अनामत रक्कम जप्तीसह रद्द केल्याचा आदेश दिला आहे. असाच निर्णय इटे येथील मंगल शिवाजी कांबळे यांच्या रास्त धान्य दुकान परवाना व केरोसीन वाटप परवान्याबाबत घेण्यात आला आहे. इटे ग्रामस्थांच्या कांबळे यांच्याविरोधातील लढ्याला यश आले आहे. (प्रतिनिधी)अखेर यश मिळाले : संग्राम सावंतगेले दीड वर्ष दाभिल येथील रास्त भाव धान्य दुकानदाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. हे आंदोलन सुडबुद्धीने केलेले नव्हते. त्यामुळे इतर धान्य दुकानदारांनी गैरसमज करून घेऊ नये. दुकानदारांचे काही प्रश्नही मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी राहू, असे स्पष्ट केले.ग्रामस्थांचा जल्लोषजिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे दुकान परवाना रद्दचे आदेश प्राप्त झाल्यानंतर इटे व दाभिल ग्रामस्थांनी जल्लोष केला.