डी. वाय. पाटील विद्यापीठाचा आज वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:52 IST2021-09-02T04:52:14+5:302021-09-02T04:52:14+5:30

येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा १६ वा वर्धापन दिन आज, बुधवारी ( दि.१ सप्टेंबर ) हॉटेल ...

D. Y. Today is the anniversary of Patil University | डी. वाय. पाटील विद्यापीठाचा आज वर्धापन दिन

डी. वाय. पाटील विद्यापीठाचा आज वर्धापन दिन

येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा १६ वा वर्धापन दिन आज, बुधवारी ( दि.१ सप्टेंबर ) हॉटेल सयाजी येथे साजरा होत आहे. यावेळी अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श सेवक पुरस्कार, विज्ञानाचार्य, कार्यरत्न, उत्कृष्ट संशोधक, गुणवंत विद्यार्थी असेही पुरस्कार देण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील हेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Web Title: D. Y. Today is the anniversary of Patil University