येथील डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील ३०३ विद्यार्थ्यांची इंडियन नेव्ही, टीसीएस, इन्फोसिस, कॅपजेमिनी, विप्रो अशा ख्यातनाम कंपनीमध्ये निवड झाली आहे. यातील काही विद्यार्थ्यांना वार्षिक ६ लाख ते १८ लाख रुपये वेतन मिळणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट अधिकारी प्रा. सुदर्शन सुतार यांनी दिली. महाविद्यालयाला मिळालेला स्वायत्त दर्जा, 'अ' दर्जाचे नॅक नामांकन आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि इतर बाबी विचारात घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी थेट कॅम्पसमध्ये येऊन अंतिम वर्षाच्या मुलांच्या लेखी परीक्षा, समूह चर्चा आणि मुलाखती घेऊन ही निवड केली. कोरोना काळातही ऑनलाइन कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात आल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी सांगितले. 'फोर्ब्ज ५००' लिस्टमधील अनेक कंपन्यांसह एकूण १०३ कंपन्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी झाल्या होत्या. अशा नामांकित कंपन्यांमध्ये डी. वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी सांगितले.
डी. वाय. पी. अभियांत्रिकीच्या ३०३ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST
येथील डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील ३०३ विद्यार्थ्यांची इंडियन नेव्ही, टीसीएस, इन्फोसिस, कॅपजेमिनी, विप्रो अशा ख्यातनाम कंपनीमध्ये निवड ...
डी. वाय. पी. अभियांत्रिकीच्या ३०३ विद्यार्थ्यांची निवड
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}