शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडे कारखान्याच्या गळीत हंगामास मनाई कायम

By admin | Updated: November 21, 2014 00:53 IST

पुढील सुनावणी बुधवारी : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिज्ञापत्र दाखल नाही

म्हाकवे : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे प्रा.लि. या साखर कारखान्यास गळीत हंगाम सुरू करण्यास उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला मनाई आदेश कायम ठेवला आहे. पुढील सुनावणी बुधवारी (दि. २६) होणार आहे.घोरपडे साखर कारखान्याच्या विरोधात दाखल केलेल्या जनसुनावणीवर आज, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कारखान्याचे वकील जहांगीरदार यांनी कारखान्याने हंगाम सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व शासकीय मान्यता घेतल्या आहेत. त्यामुळे मनाई आदेश उठवून हंगाम सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती केली.परंतु याचिकाकर्ते कृष्णात धामणकर व इतर तीन याचिकेच्या बाबतीत युक्तिवाद करताना अ‍ॅड. विजयसिंह थोरात यांनी चिकोत्रा धरण हे परिसरातील गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी व शेतीसाठी बारमाही पाणीपुरवठा व्हावा यासाठी बांधले आहे. उद्योगधंद्यासाठी पाण्याची तरतूदच नाही. तरीसुद्धा या कारखान्याची उभारणी चिकोत्रा तिरावर केवळ एक कि.मी. अंतरावर झाली आहे. तसेच या कारखान्यामुळे चिकोत्रा नदीच्या काठावरील सुमारे २० ते २५ गावांतील लोकांना पाणीपुरवठ्याचा फटका बसणार आहे. हा कारखाना डोंगर पठारावर असल्याने त्यामुळे प्रदूषणात भरच पडणार आहे.त्याचबरोबर बेलेवाडी येथील उभारणी झालेल्या ४६६ गट नंबरची मालकी कारखान्याची नसून यामध्ये हिस्सेदार मारुती पाटील व इतरही हिस्सेदारांचा समावेश आहे. तसेच बरीच कामे बेकायदेशीर व प्रदूषणाबाबत घेतलेल्या अनेक परवानग्या या बेकायदेशीर असल्याचे मंडलिक कारखान्याच्यावतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रतिज्ञापत्र दाखल न झाल्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला करण्याचे आदेश देत कारखान्याच्या गळीत हंगामाला मनाई कायम ठेवली आहे.तारीख पे तारीख ‘संभ्रम’गेल्या दोन महिन्यांपासून घोरपडे कारखान्याविरोधात दाखल झालेल्या सुनावणीसंदर्भात अंतरिम निर्णय न होता तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे या कारखान्याचा गळीत हंगाम लांबणीवर पडत आहे. या कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन झाल्यामुळे दररोज कारखान्याचा लाखो रुपयांचा तोटा होत आहे. तसेच शेतकरी, ऊसतोड, वाहतूकदार, कर्मचाऱ्यांतही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.