शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यावर प्री-वेडिंग फोटोसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:52 IST

नितीन भगवान । पन्हाळा : पारंपरिक पद्धतीने विवाह करणे आता नव्या पिढीला रुचत नसल्याने काहीतरी हटके आणि वेगळे करण्याचे ...

नितीन भगवान ।
पन्हाळा : पारंपरिक पद्धतीने विवाह करणे आता नव्या पिढीला रुचत नसल्याने काहीतरी हटके आणि वेगळे करण्याचे ठरते. यातील विवाहपूर्व (प्री-वेडिंग) छायाचित्रणासाठी पन्हाळ्यावर गर्दी होऊ लागली आहे.
रुढी-परंपरेनुसार प्रत्येक धर्माची विवाह करण्याची पद्धती वेगळी असली तरी यात सर्वांत महत्त्वाचे ठरते ते फोटोसेशन, पण हेसुद्धा पारंपरिकच. नव्या पिढीला आपल्या होणाऱ्या जोडीदाराबरोबर बोलता यावे, ओळख व्हावी, स्वभाव कळावा या हेतूने विवाहपूर्वी एकमेकांना भेटता यावे यादृष्टीने नवा फंडा निर्माण झाला. याचा परिणाम म्हणजे लग्नापूर्वी फोटोसेशन केले जाते. खरंतर हेतू चांगलाच आहे, पण फोटोसेशनमध्ये काहीतरी वेगळे करण्याचे ठरते व झाडावर चढ, उंच कड्यावर चढ आणि वेगळ्या पद्धतीने फोटो काढताना बºयाचवेळा अपघात होतात. याची नोंद कुठेही होत नाही. या अपघातामुळे होणारे विवाह लांबणीवर पडतात अथवा कटुता येते. मग असे हटके फोटो सेशन विवाहपूर्व हवेतच का? असाही प्रश्न पडतो.
पन्हाळ्यावर ऐतिहासिक इमारती भरपूर आहेत. या ठिकाणी पुरातत्त्व विभाग छायाचित्र अथवा छायाचित्रणासाठी कसलीही परवानगी देत नाही. या ठिकाणी हे प्री-वेडिंग फोटोसाठी गर्दी होते. विषेशत: तीन दरवाजा, अंधारबाव व नायकिणीचा सज्जा या ठिकाणी हे फोटोसेशन होत असता पुरातत्त्वचे कर्मचारी व फोटोग्राफर यांच्यामध्ये भांडणे, प्रसंगी हातघाई होते. यातून पन्हाळ्याविषयी गैरसमज पसरवला जातो, खरंतर पन्हाळा पोलिसांनी याविषयी लक्ष घालणे जरुरीचे आहे. ऐतिहासिक, पौराणिक व निसर्गाने नटलेल्या या पन्हाळ्यावर आता आणखीन एक नवी ओळख निर्माण होते आहे. प्री-वेडिंग फोटोसेशन पण यासाठी लागणाºया परवानग्या अथवा त्याची नोंद असावी इतकीच माफक अपेक्षा आहे. निसर्गाने भरलेल्या पन्हाळ्यावर फोटो सेशन करताना पुसाटी बुरुज, तानपीर परिसर हा भाग वनविभागाकडे आहे. याठिकाणी प्री-वेडिंगचे फोटो घ्यावयाचे असतील तर वन विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे वनरक्षक व्ही. टी. दाते यांनी सांगितले.