उमगाव येथे टस्करकडून पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST2021-09-23T04:28:27+5:302021-09-23T04:28:27+5:30

शेतशिवारात सध्या पोटरीला (पोसवण्याच्या स्थितीत) आलेले भात पीक, पूर्ण वाढ झालेला ऊस, नाचणी या पिकांचे मोठ्या प्रमाणात ...

Crop damage from tusker at Umgaon | उमगाव येथे टस्करकडून पिकांचे नुकसान

उमगाव येथे टस्करकडून पिकांचे नुकसान

शेतशिवारात सध्या पोटरीला (पोसवण्याच्या स्थितीत) आलेले भात पीक, पूर्ण वाढ झालेला ऊस, नाचणी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या टस्करने केले आहे. टस्कर भात आणि ऊस पिकांचे शिवारात घुसून, खाऊन, तुडवून व लोळवून, मोडतोड करून नुकसान करत आहे. वन विभागाकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून क्षेत्र भेट देऊन पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले, वनपाल दयानंद पाटील, वनमजूर गुंडू देवळी व नितीन नाईक यांच्या पथकाने उमगाव, धुरीवाडी, सावताचीवाडी येथील पीक नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. उमगावपैकी धुरीवाडी येथील गोविंद गावडे यांचे भात, नाचणी व शेतातील घर,ज् ञानेश्वर गावडे, रामभाऊ धुरी, एकनाथ धुरी, अर्जुन धुरी यांचा ऊस, संजीवनी धुरी, भारत गावडे यांच्या नाचणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्तीकडून नुकसान झालेल्या भात, ऊस व नाचणी या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.

फोटो ओळी:--

टस्करकडून उमगाव पैकी धुर्याचीवाडी परिसरात पिकांचे असे नुकसान सुरू आहे.

Web Title: Crop damage from tusker at Umgaon