आंदोलनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST2021-04-30T04:31:48+5:302021-04-30T04:31:48+5:30

इचलकरंजी : येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहाजणांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून ...

Crime against six persons for attempting agitation | आंदोलनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा

आंदोलनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा

इचलकरंजी : येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहाजणांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून मोबाईल व इतर साहित्य असा एकूण एक लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी सकाळी करण्यात आली.

अमर सुबराव कोळी (वय २६), राजकुमार किशोरीलाल यादव (२९), प्रल्हाद प्रसन्ना ग्वाडी (३६, तिघे रा. तारदाळ, ता. हातकणंगले), सचिन शंकर दरिबे (१९, रा. गावभाग), रमेश नामदेव साळुंखे (२९, रा. लिंबू चौक), राहुल रामकृष्ण कांबळे (२९, रा. जयसिंगपूर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, नोंदणीकृत नसलेल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे यांच्या सांगण्यावरून वरील सर्वांनी प्रेस लिहिलेल्या बनावट ओळखपत्राचा वापर करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. तसेच पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Crime against six persons for attempting agitation