निगवेत मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:17 IST2021-07-10T04:17:40+5:302021-07-10T04:17:40+5:30

कोल्हापूर : भागीरथी माळ, निगवे दुमाला (ता. करवीर) येथे पैशाच्या देवघेवीवरून दोघांनी एकास शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी ...

Crime against both in Nigvet beating case | निगवेत मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा

निगवेत मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा

कोल्हापूर : भागीरथी माळ, निगवे दुमाला (ता. करवीर) येथे पैशाच्या देवघेवीवरून दोघांनी एकास शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी करवीर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. अक्षय जयसिंग कळके (वय २४, रा. इंदिरानगर, वडणगे) यांनी फिर्याद दिली. शाम मुल्लाणी व सौरभ शिवाजी पाटील (दोघे रा. निगवे दुमाला) अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे आहेत. बुधवारी (दि.७) सायंकाळी सहा वाजता संशयितांनी पैशाच्या देवघेवीवरून फिर्यादी कळके यास काठीने मारहाण केली.

राहत्या घरातून पैशाच्या पाकीटासह मोबाइल लंपास

कोल्हापूर : राजारामपुरी दौलतनगर येथे राहत्या घरातून पैशाचे पाकिट व मोबाईल असा १८ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. ही चोरीची घटना गुरुवारी रात्री घडली. सुशांत सुरेश जाधव (वय २६, रा. अष्टविनायक मित्र मंडळाजवळ, दौलतनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविला.

यात्री निवासमधून मोबाईल लंपास

कोल्हापूर : ताराबाई रोडवरील एका यात्री निवासमधील तळमजल्यावरील हाॅलमधून ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला. याबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला. राहुल सदाशिव मारकर (वय ३०, रा. मनीषा हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली बुद्रुक, पुणे) असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी मारकर हे रात्री साडेनऊच्या सुमारास ताराबाई रोडवरील एका यात्री निवासमध्ये आले होते. त्या दरम्यान तळमजल्यावरील हाॅलमधून त्यांचा किमती मोबाईल चोरट्याने लंपास केला.

Web Title: Crime against both in Nigvet beating case