शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतीचीही रेषा तयार करा

By admin | Updated: November 27, 2015 01:04 IST

गौतमीपुत्र कांबळे : शिवाजी विद्यापीठात भारताचा संविधान दिन साजरा

कोल्हापूर : भारतात आता दारिद्र्यरेषेप्रमाणे श्रीमंतांची यादी करून त्यांची एक श्रीमंतीचीही रेषा तयार करा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. गौतमीपुत्र कांबळे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र यांच्यावतीने गुरुवारी भारताचा संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त मानव्यशास्त्र विभागात आयोजित ‘भारतीय राज्यघटना व डॉ. आंबेडकर’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, संविधान केवळ जगण्याचा विषय नाही, तर सामाजिक पर्यावरण बदलण्याचा घटनेने दिलेले साधन आहे. सर्व धार्मिकस्थळांवर जमा होणारी संपत्ती, दुरुस्ती, देखभाल वजा करून थेट सरकारी तिजोरीत जमा केली पाहिजे. त्यामुळे देशातील जरूरीच्या गोष्टी विना कर्ज जनतेकरीता उपलब्ध होतील. अनेक देशांत उत्क्रांती झाली म्हणून त्या-त्या देशात ‘संविधान’ तयार झाले. आजही अस्पृश्यता राजरोसपणे आहे. भारतातील प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यात अस्पृश्यता नाही, असे जाहीर करावे. त्यांना मी स्वत: एक हजाराचे बक्षीस देईन. आरक्षणामध्येही कळीचे मुद्दे आले आहेत. त्यात तुमचा आर्थिक दर्जा सुधारला आम्हालाही आरक्षण द्या, अशा प्रतिक्रिया अन्य जातीच्या नागरिकांकडून आल्या. आजपर्यंत ज्या संविधानात राहून गेलेल्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी धरण्याचा सर्वांनी आग्रह धरला पाहिजे. याशिवाय विद्यापीठ स्तरावर ‘संविधान’ हा विषय सक्तीचा करावा, असे मत त्यांनी मांडले. यावेळी कांबळे यांनी संविधानाची परिभाषा, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, आदी विषयांवर विस्तृत मते मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे समन्वयक डॉ. कृष्णा किरवले म्हणाले, धर्मनिरपेक्षता हाच कळीचा मुद्दा झालेला आहे. त्यामुळे संविधानचा डोलारा डोलायमान होत आहे. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील यांनी संविधान सरनामा वाचन केले. यावेळी डॉ. भगवान माने, विद्यार्थी उपस्थित होते.