शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांचा राजीनामा मागे; रस्ता होणार

By admin | Updated: November 28, 2014 00:33 IST

सव्वा कोटी रुपये मनपा खर्च करणार : उद्यापासून रस्ता बंद ठेवणार : सुनीता राऊत

कोल्हापूर : रंकाळा टॉवर ते जुना वाशीनाका हा गेली चार वर्षे रखडलेला रस्ता करा, अन्यथा उद्या, शुक्रवारी होणाऱ्या महासभेत राजीनामा देऊ, असा पवित्रा घेतलेल्या माजी महापौर सुनीता राऊत, अरुणा टिपुगडे, परीक्षित पन्हाळकर या नगरसेवकांना दिलासा मिळाला. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आज, गुरुवारी महापौर तृप्ती माळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी रस्त्यासाठी येणारा सव्वा कोटी रुपयांचा खर्च महापालिका करेल, असे आश्वासन दिले. आयआरबीने करावयाच्या रस्त्यासाठी व अपूर्ण कामासाठीही नगरसेवकांनी दबाव तंत्राचा वापर करावा, असे आवाहनही आयुक्तांनी या बैठकीत केले.जुना वाशीनाका ते रंकाळा टॉवर रस्त्यावर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. महापालिका, आयआरबी व रस्ते विकास महामंडळ यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार हा रस्ता आयआरबीने करणे बंधनकारक आहे. मात्र, अपेक्षित टोलवसुली नसल्याने हा रस्ता महापालिकेनेच करावा, असे पत्र आयआरबीने मनपा प्रशासनास दिले.यानंतर वाद सुरू झाला. महासभेपूर्वी रस्त्याचे काम सुरू न केल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला. आज नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीत राज्य शासनाकडून आलेल्या दोन कोटी साठ लाख रुपयांच्या मूलभूत सुविधा निधीतून हा रस्ता करण्याचे ठरले. आठवड्यात रस्त्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. उद्या अधिकारी पाहणी करणार आहेत. दरम्यान, रस्त्याचे काम होईपर्यंत रस्ता बंद ठेवणार असल्याची माहिती सुनीता राऊत यांनी दिली. बैठकीस उपमहापौर मोहन गोंजारे, सभापती सचिन चव्हाण, राजेंद्र लाटकर, उत्तम कोराणे, आदी उपस्थित होते. आयआरबीची २५ कोटी बॅँक गॅरंटी जप्त करून उर्वरित कामे करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी राज्य शासनाशी पत्रव्यवहार केला आहे. बॅँक गॅरंटी मिळविण्यासाठीही नगरसेवकांनी प्रशासनास मदत करावी. - आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी