कोरोनाचीमहामारी - राेगापेक्षा इलाज भयंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST2021-05-31T04:17:42+5:302021-05-31T04:17:42+5:30

-मुख्य कॉमन लिड- कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा विस्फोट झालेला आहे. रोज दोन हजारांवर नागरिक कोरोनाबाधित होत आहेत, ...

Coronary epidemic - treatment worse than anger | कोरोनाचीमहामारी - राेगापेक्षा इलाज भयंकर

कोरोनाचीमहामारी - राेगापेक्षा इलाज भयंकर

-मुख्य कॉमन लिड-

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा विस्फोट झालेला आहे. रोज दोन हजारांवर नागरिक कोरोनाबाधित होत आहेत, तर ४० ते ५० नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे. एकीकडे सरकारी आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर प्राणपणाने लढून या साथील आळा घालण्याचा, रुग्णांवर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे नागरिकांमधील भीतीचा गैरफायदा घेत काही खासगी रुग्णालये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून अक्षरश: लूटमार करताना दिसत आहेत. कोरोना चाचणी, एचआरसीटी, रक्तांच्या विविध चाचण्यांपासून ते औषधे, रेमडेसिविर ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या बिलांमुळे रुग्णांचे नातेवाईक हैराण झाले आहेत. नातेवाईकांच्या खिशांना कात्र्या लागत आहेत. त्याबद्दल जनतेत प्रचंड चीड आहे. सरकारने अशा अपप्रवत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम केलेत, अधिकारी नेमलेत. तरीही जिल्हा प्रशासन त्यावर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी झाले आहे. त्यामुळे कोरोनाचे उपचार म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी अवस्था झाली आहे.

Web Title: Coronary epidemic - treatment worse than anger