सेनापती कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST2021-03-04T04:45:09+5:302021-03-04T04:45:09+5:30

: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कापशी व चिकोत्रा परिसरातील सर्व नागरिकांसाठी कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. कापशी ...

Corona vaccination at Senapati Kapashi Primary Health Center | सेनापती कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण

सेनापती कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण

: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कापशी व चिकोत्रा परिसरातील सर्व नागरिकांसाठी कोरोना लस देण्यास सुरुवात झाली.

कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस उपलब्ध झाली असून, लस देण्याचा प्रारंभ आज माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांच्याहस्ते झाला.

यावेळी शशिकांत खोत म्हणाले, सेनापती कापशीसह चिकोत्रा परिसरातील सर्व नागरिकांसाठी कोरोना लस उपलब्ध झाली असून, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी ही लस टोचून घ्यावी. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून, कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी ही लस टोचून घ्यावी .

यावेळी आरोग्य कमिटी सदस्य लगमा कांबळे, चंद्रशेखर स्वामी, चंद्रकांत सनगर, डॉक्टर विशाल शिंदे, एस. आर. पाटील आदींसह प्राथमिक आरोग्य केंद्राचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

Web Title: Corona vaccination at Senapati Kapashi Primary Health Center