शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

अत्यावश्यक सेवेअंतर्गत येणाऱ्या व्यापारी आणि त्यांच्याकडे येणाऱ्या कामगारांसह सर्व आस्थापनांतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. शासनाने व्यापारी, ...

अत्यावश्यक सेवेअंतर्गत येणाऱ्या व्यापारी आणि त्यांच्याकडे येणाऱ्या कामगारांसह सर्व आस्थापनांतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. शासनाने व्यापारी, कर्मचाऱ्यांना सुपर स्प्रेडर घोषित केले असून त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी आणि आपले दुकान सकाळी १ ते ११ या वेळेत चालू ठेवावे, असे सांगितले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार गडहिंग्लज शहरातील सर्व व्यापारी, कामगारांसह, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांचीही कोरोनाची चाचणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय व पालिकेने मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना चाचणीची मोहीम सुरू केली आहे.

उपनगराध्यक्ष महेश कोरी, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेला प्रारंभ झाला.

याप्रसंगी कोरी, मुतकेकर यांनी व्यापारी, कामगारांना कोरोना चाचणी करून घेण्याबाबत आवाहन केले. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करून दंडात्मक कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शहरातील प्रत्येक चौकामध्ये व्हॅन नेऊन तपासणी केली जात आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडील कर्मचारी सर्व सुविधांसह सज्ज ठेवण्यात आले आहेत.

यावेळी नगरसेवक राजेश बोरगावे, नरेंद्र भद्रापूर यांच्यासह पालिका व उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी :

गडहिंग्लज पालिकेतर्फे शहरातील व्यापारी व विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी मोहीम राबविण्यात आली. नेहरू चौकात नागरिकांचे स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी.

क्रमांक : २२०४२०२१-०१