शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने आटला सामाजिक दातृत्वाचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

कोल्हापूर : गेल्या वर्षीपासून माणसाच्या हात धुऊन पाठीमागे लागलेल्या कोरोनामुळे सामाजिक संस्था अडचणीत आल्या आहेत. शासनाचे अनुदान नाही, अनुदान ...

कोल्हापूर : गेल्या वर्षीपासून माणसाच्या हात धुऊन पाठीमागे लागलेल्या कोरोनामुळे सामाजिक संस्था अडचणीत आल्या आहेत. शासनाचे अनुदान नाही, अनुदान असेल तरी पैसे मिळालेले नाही, नोकरी-व्यवसाय उद्योगधंद्यांवर परिणाम झाल्याने देणगीदार कमी झाले. वस्तू रूपाने थोडीफार मदत मिळते; पण आर्थिक गरजा कशा भागवायच्या, असा प्रश्न आता या संस्थांपुढे आहे.

समाजातील वयोवृद्ध नागरिकांसाठी चालवले जाणारे वृद्धाश्रम, दिव्यांग-परावलंबी व्यक्तींसाठीचे केअर सेंटर, अनाथ निराधार मुलांचे पालकत्व निभावणाऱ्या संस्था या नागरिकांच्या देणगीतूनच चालतात. मात्र गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाची लागण झाली आणि त्याचा परिणाम सामाजिक संस्थांना मिळणाऱ्या मदतीवर झाला.

ज्यांना शासनाचे अनुदान नाही त्या संस्था तर खूपच अडचणीत आल्या आहेत. उद्याेगधंदे बंद होते, व्यवसायावर परिणाम झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कमी झाले त्यामुळे दातृत्वाचा ओघ कमी झाला. काही संस्थांना अनुदान आहे; पण खर्च शंभर रुपयांचा असेल तर ४० रुपयेच मिळतात. तेही वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे अनुदानित संस्थांनाही देणगीदारांवर अवलंबून राहावे लागते. आता पुन्हा मदत मिळायला सुरुवात झाली असली तरी मागील तूट काही भरून निघत नाही. त्यात स्थिती थोडी फार पूर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे त्यामुळे या संस्थांना प्रत्येकाचे आपल्या परीने शक्य तितकी मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

मातोश्री वृद्धाश्रम

आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमाला अनुदान मिळत नाही. येथे ५५ ज्येष्ठ नागरिक आणि कर्मचारी असे ७० लोक राहतात. काही ज्येष्ठांच्या घरून दर महिन्याला पैसे पाठवले जातात; पण गेल्यावर्षीपासून ही रक्कमही येणे कमी झाली आहे. गरीब १२ वृद्धांकडून एक रुपयाही घेतला जात नाही. संस्था मोठ्या अडचणीत असून धान्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू, औषधे यासह अर्थसाहाय्याची गरज आहे. संस्थेचा दवाखाना मेडिकल असोसिएशनने चालवावा, अशी आमची इच्छा आहे.

शिवाजीराव पाटोळे (मातोश्री वृद्धाश्रम)

--

शिशू आधार केंद्र

जगरनगर येथील शिशू आधार केंद्राला अनुदान नसल्याने देणगीदारांवरच संस्था चालते. लॉकडाऊनमध्ये ९हून अधिक बालके होती, हा काळ खडतर होता. नोव्हेंबरनंतर पुन्हा दत्तक प्रक्रिया सुरू झाल्यावर पाच बालकांना पालक मिळाले. आता संस्थेत चार बालके असून नव्याने येणाऱ्या बालकांची जबाबदारी निभावताना तारेवरची कसरत होते. पूर्वी देणगीदारांना फोनवरून मदत मागता यायची आता त्यांचीच काय स्थिती असेल याचा अंदाज नसल्याने मदत मागायला धजावत नाही.

डॉ. प्रमिला जरग (शिशू आधार केंद्र)

--

सावली केअर सेंटर

नाळे कॉलनीतील सावली केअर सेंटरमध्ये दिव्यांग-परावलंबित्व असलेले व सर्व वयोगटातील २५० लाेक राहतात, त्यापैकी ८० जणांना मोफत सेवा दिली जाते. संस्थेला अनुदान मिळते; पण ते वेळेवर येत नाही. दुसरीकडे खर्च थांबवू शकत नाही. लॉकडाऊनमध्ये शासनाने सामाजिक संस्थांना कमी दरात धान्य उपलब्ध करून दिल्याने मोठी मदत झाली; पण देणगीदारांचा ओघ थांबला. सगळ्यांचीच आर्थिक स्थिती बिकट असल्याने मदत कुणाकडे मागायची, असा प्रश्न येतो.

डॉ. किशोर देशपांडे

--

बालकल्याण संकुल

मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलमध्ये शून्य ते १८ वयोगटातील मुले-मुली, किशोरवयीन मुली, निराधार महिला असे एकूण २४० जण राहतात. संस्थेला अनुदान मिळते. मात्र दोन वर्षांपूर्वीच्या अनुदानाचा अंशत: आणि गतवर्षीची पूर्ण रक्कम येणे बाकी आहे. देणगीदारांची संख्या मोठी असली लॉकडाऊनचा काळ खडतर होता. तेव्हा विश्वस्तांनी जोडणी लावली. आवाहनानंतर मदत पुन्हा सुरू झाली. पण निवासींची संख्या मोठी असल्याने खर्चही तितकाच जास्त होत असतो.

पद्मजा तिवले (मानद कार्यवाह)