शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur -रस्त्यावर रविवारी कोण आल्यास कडक कारवाई : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 18:39 IST

‘कोरोना विषाणू’चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आदेश लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री नऊ वाजता नागरिकांनी नऊ मिनिटे घरातील वीज बंद करून दिवे लावावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आवाहनाचे उल्लंघन करून कोणी घराबाहेर पडल्यास किंवा रस्त्यावर आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच हुल्लडबाजीही खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी येथे दिला.

ठळक मुद्देरस्त्यावर उद्या कोण आल्यास कडक कारवाई : जिल्हाधिकारी हुल्लडबाजी खपवून घेणार नाही

कोल्हापूर : ‘कोरोना विषाणू’चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आदेश लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री नऊ वाजता नागरिकांनी नऊ मिनिटे घरातील वीज बंद करून दिवे लावावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आवाहनाचे उल्लंघन करून कोणी घराबाहेर पडल्यास किंवा रस्त्यावर आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच हुल्लडबाजीही खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी येथे दिला.‘लॉकडाऊन’च्या दहाव्या दिवशी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला. कोरोना लढाईचा भाग म्हणून रविवारी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घरातील वीज बंद करावी. त्यानंतर घरात, बाल्कनी किंवा टेरेसवर जाऊन दिवे, मेणबत्ती किंवा टॉर्च लाईट नऊ मिनिटे प्रज्वलित करावीत, असे आवाहन मोदी यांनी देशवासीयांना केले आहे. तसेच यावेळी कोणीही घराबाहेर येऊ नये, घरात राहूनच हे काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.परंतु ‘जनता कर्फ्यू’वेळी नागरिक सायंकाळी थाळ्या वाजवत बाहेर पडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा अनुभव ताजा असल्याने उद्याही असाच प्रकार नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आपापल्या घरातच थांबावे. कोणीही घरातून बाहेर पडून रस्त्यावर येऊन हुल्लडबाजी करू नये. अशी हुल्लडबाजी केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी देसाई यांनी दिला. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर