शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur - दारात आलेला रुग्ण नाकारला कसा जातो?, यड्रावकर यांनी विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 17:23 IST

जिल्हा प्रशासनाने एकदा ठरवून दिल्यानंतर रुग्णालयाच्या दारात आलेला रुग्ण नाकारला कसा जातो, असा संतप्त सवाल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपस्थित केला. महापालिका क्षेत्रातील रुग्णालये असे करणार असतील तर तसा अहवाल आयुक्तांना पाठवा. उद्याच्या उद्या सर्वसामान्य रुग्णांना मदत करणारे हेल्पलाईन नंबर जाहीर करा, असे स्पष्ट आदेश यड्रावकर यांनी दिले.

ठळक मुद्दे दारात आलेला रुग्ण नाकारला कसा जातो?, यड्रावकर यांनी विचारला जाब‘लोकमत’च्या बातमीची घेतली दखल

कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने एकदा ठरवून दिल्यानंतर रुग्णालयाच्या दारात आलेला रुग्ण नाकारला कसा जातो, असा संतप्त सवाल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपस्थित केला. महापालिका क्षेत्रातील रुग्णालये असे करणार असतील तर तसा अहवाल आयुक्तांना पाठवा. उद्याच्या उद्या सर्वसामान्य रुग्णांना मदत करणारे हेल्पलाईन नंबर जाहीर करा, असे स्पष्ट आदेश यड्रावकर यांनी दिले.यड्रावकर यांनी शनिवारी सकाळी सीपीआरमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. ‘लोकमत’मध्ये शनिवारीच ‘सीपीआर बंद, उपचार कुठे, खर्च कोण करणार?’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत मंत्र्यांनी याबाबत दिवसभरामध्ये योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकि त्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आदी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.यावेळी मंत्र्यांनी कामगार विमा रुग्णालयाचे सध्या काय चालले आहे, अशी विचारणा केली. तेव्हा त्यांची बाह्यरुग्ण सेवा सुरू आहे. मात्र, त्यांनी तेथे खुदाई करून ठेवली आहे. अजून दोन महिने काम चालेल, असे डॉ. केम्पीपाटील यांनी सांगितल्यानंतर यड्रावकर भडकले. ‘गेले दीड महिना कोरोनाचा गोंधळ सुरू आहे. कुणालाच जबाबदारी घ्यायला नको? असे उद्विग्न उद्गार त्यांनी काढले. त्यांच्याकडे जे ४५ डॉक्टर्स आणि कर्मचारी आहेत, ते नियमित कामासाठी घेण्याबाबत पत्र तयार करण्याच्याही सूचना यड्रावकर यांनी दिल्या.वैद्यकीय महाविद्यालयातील पीपीई किट, ग्लोव्हज्, मास्क ची स्थिती त्यांनी जाणून घेतली. इचलकरंजीतील पीपीईमध्ये काही सुधारणा केल्यास ते किट उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले. जे आवश्यक साहित्य येथे कमी आहे, ते जिल्हा परिषदेकडून दिले जाईल, तशी मागणी द्या, असे डॉ. योगेश साळे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याministerमंत्रीkolhapurकोल्हापूर