शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur -होमगार्डवरच अ‍ॅट्रासिटी दाखल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 15:04 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होउ नये म्हणून कोल्हापूर शहरात बंदोबस्तावर असणाऱ्या होमगार्डला अ‍ॅट्रासिटीची धमकी देणाऱ्या सदर बाजार येथील शेखर सनदी या व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी होमगार्ड शैलेश माळी यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

ठळक मुद्देहोमगार्डवरच अ‍ॅट्रासिटी दाखल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखलसरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होउ नये म्हणून कोल्हापूर शहरात बंदोबस्तावर असणाऱ्या होमगार्डला अ‍ॅट्रासिटीची धमकी देणाऱ्या सदर बाजार येथील शेखर सनदी या व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी होमगार्ड शैलेश माळी यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेल्या संचारबंदीची अंमलबजावणी कोल्हापूर शहरात काटोकोरपणे सुरु आहे. यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने विविध मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांना मदत म्हणून होमगार्डच्या जवानांचीही मदत घेतली जाते.

दि.२७ मार्च रोजी रात्री ८.३0 वाजण्याच्या सुमारास होमगार्ड जवान शैलेश माळी हे सदर बाजार येथील मस्जिद चौकाजवळ बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यावेळी सदर बाजार येथील शेखर सनदी याने तोंडाला मास्क न घालता माळी यांच्याजवळ येत दमदाटी केली.

होमगार्डला ड्यूटी लागलेली नाही, लोकांना घरी बसा म्हणून सांगण्याचा तुम्हाला काय अधिकार अशा शब्दात त्याने दमदाटी केली. तसेच तुम्ही लोकांना दमदाटी करु नका, अशी उध्दट भाषा वापरत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.शेखर सनदी याने एका पेपरचा आपण संपादक असून सदर बाजार येथे राहत असल्याचे माळी यांना सांगितले. मी तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो आहे, हे सांगत आपल्याजवळील मोबाईल कॅमेºयावरुन शूटींग केल्यासारखे केले.

तुम्ही कशी ड्यूटी करता हे एस.पी आणि डीवायएसपी यांना पाठवतो, असे म्हणत अरेतुरेच्या भाषेत धमकी दिली आणि येथून निघून जाण्यास सांगितले. सनदी याने जवान माळी यांना धक्का देत तुमच्यावर अ‍ॅट्रासिटीची तक्रार करण्याचीही धमकी दिली.जवान माळी यांनी याप्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यात सनदी याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून भादंविस कलम ३५३, ३२३, ५0६ तसेच महाराष्ट्र कोवीड १९ उपाय योजना २0२0 चे कलम ११ नुसार सनदी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी