पाणंद रस्ते दुरुस्ती उपक्रमास सहकार्य करावे -मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:08+5:302021-02-05T07:01:08+5:30

मनरेगाअंतर्गत राज्यातील एक लाख कि.मी इतक्या लांबीचे पाणंद रस्ते दुरुस्ती करण्याचा शुभारंभ, तसेच महानिवास अभियान कार्यक्रम ...

Cooperate in Panand Road Repair Project - Mushrif | पाणंद रस्ते दुरुस्ती उपक्रमास सहकार्य करावे -मुश्रीफ

पाणंद रस्ते दुरुस्ती उपक्रमास सहकार्य करावे -मुश्रीफ

मनरेगाअंतर्गत राज्यातील एक लाख कि.मी इतक्या लांबीचे पाणंद रस्ते दुरुस्ती करण्याचा शुभारंभ, तसेच महानिवास अभियान कार्यक्रम आज कोल्हापूर जिल्ह्यातील वंदूर गावी करण्यात आला. तेव्हा मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

माजी आ. संजय घाटगे, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा बँक संचालक भय्या माने, पंचायत समिती सभापती पूनम महाडिक, सदस्य रमेश तोडकर, धनराज घाटगे आदी प्रमुख उपस्थितीत होते. संजय घाटगे म्हणाले की, आपल्या भागात प्रामुख्याने शेती उत्पादने नेहण्यासाठी पाणंदचा उपयोग होतो. उसाने भरलेली वाहने बाहेर काढणे दिव्य असते. या योजनेमुळे शेतकरी वर्गास लाभ होईल. स्वागत ग्रामसेवक एन.के कांबळे यांनी केले. प्रास्ताविक भाषणात गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी पाणंद विकास योजना, तसेच महाआवास अभियान याची माहिती दिली. उत्तम कांबळे, युवराज पाटील यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन नामदेव चौगुले यांनी केले, तर आभार एम.एस. कांबळे यांनी मानले.

फोटो कॅपशन

मनरेगाअंतर्गत राज्यातील पाणंद रस्ते दुरुस्ती उपक्रमांचा शुभारंभ वंदूर, ता. कागल येथे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजय घाटगे, युवराज पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Cooperate in Panand Road Repair Project - Mushrif