शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या मूल्यांकनावर मतैक्य व्हावे

By admin | Updated: August 22, 2015 01:06 IST

कृती समितीची अपेक्षा : टोल रद्द होईपर्यंत वसुली नकोे; एन. डी. पाटील

कोल्हापूर : आयआरबीने शहरात केलेल्या रस्त्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. मूल्यांकनाच्या बाबतीत कोणतीही कसूर राहिलेली नाही. आयआरबी, नोबेल कंपनी आणि सर्वपक्षीय कृती समिती यांनी केलेल्या मूल्यांकनाबाबत मतैक्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्य सरकारने आता लवकरात लवकर टोल रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले तर टोल रद्द होईपर्यंत आता वसुली केली जाऊ नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मूल्यांकन समिती, नोबेल कंपनी आणि सर्वपक्षीय कृती समितीने केलेले मूल्यांकन आयआरबी कंपनीने अमान्य केले होते. त्यामुळे ‘आयआरबी’च्या म्हणण्याप्रमाणे टेंडरमधील दराप्रमाणे मूल्यांकन करण्याची सूचना राज्य सरकारने केली होती. त्यानुसार कृती समितीने हे मूल्यांकन करून त्याचा अहवाल गुरुवारीच सादर केला. त्याचे मूल्यांकन २५९ कोटी ७४ कोटी केले असून न केलेली कामे आणि चुकीच्या कामांचे मूल्य १२० कोटी ३९ लाख रुपये वजा जाता आयआरबीला फक्त १३९ कोटी ३५ लाख रुपये आणि त्यावरील व्याजाची रक्कम द्यावी लागणार आहे. नोबेल कंपनीच्या सर्वेक्षणावर आधारित डीएसआरप्रमाणे रस्त्यांचे मूल्यांकन २३९ कोटी ६२ लाख रुपये इतके झाले होते. त्यातील अपूर्ण कामे, चुकीची कामे याची किंमत वजाजाता १५८ कोटी २६ लाख रुपये द्यावे लागतील, असे पूर्वीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता १५८ कोटी २६ लाख आणि १३९ कोटी ३५ लाख अशा दोन रकमांवर मूल्यांकन येऊन थांबले आहे. आर्किटेक्ट असोसिशएनचे राजेंद्र सावंत यांनी या मूल्यांकनाबाबतची सविस्तर माहिती शुक्रवारी पत्रकार व कृती समितीच्या सदस्यांना दिली. ‘आयआरबी’ने केलेले सर्व दावे या मूल्यांकनाच्या माध्यमातून खोडून काढले असून अनेक बाबी आयआरबीला मान्य करणे भाग पडले असल्याचे सावंत यांनी सांगितले. जागेवरील मापे, डांबराचे नमुने,कॉँक्रीटचा दर्जा याबाबतचे सर्व दावे आपण चुकीचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रामभाऊ चव्हाण, दिलीप पवार, बाबूराव कदम, पंडितराव सडोलीकर, बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, लाला गायकवाड, गणी आजरेकर, भगवान काटे, चंद्रकांत यादव, दीपा पाटील, वैशाली महाडिक, बाबा महाडिक, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)