शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते उद्घाटनाचे कवित्व सुरूच

By admin | Updated: December 19, 2014 00:45 IST

शीतयुद्ध पेटणार : माजी मंत्री सतेज पाटील यांचा तीन कोटींचा निधी : कॉँग्रेसने केला दावा

कोल्हापूर : शहरातील रस्त्यांच्या उद्घाटनावरून माजी मंत्री सतेज पाटील व आमदार अमल महाडिक यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. महापालिकेच्या दक्षिण मतदारसंघातील विकासकामांची पाटील यांच्या हस्ते काल, बुधवारी होणारी उद्घाटने आमदार महाडिक यांचे कार्यक्रम पत्रिकेवर नाव नसल्याने रद्द करावी लागली. महाडिक समर्थकांनी राजशिष्टाचाराचा भंग केल्याबद्दल प्रशासनाला हक्कभंगाच्या प्रस्तावाची भीती दाखविल्याची चर्चा आहे. दरम्यान, या कामांसाठी पाटील यांनी ३ कोटी १७ लाखांचा निधी आणल्याचे पत्रक कॉँग्रेसचे पक्षप्रतोद चंद्रकांत घाटगे व स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिले. त्यामुळे भविष्यात रस्त्यांच्या उद्घाटनांचे कवित्व मनपात जोरदार रंगणार असल्याची चर्चा आहे.महापालिकेच्या हद्दीतील उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात विभागलेल्या दहा ते बारा विकासकामांच्या उद्घाटनांचे नियोजन माजी मंत्री पाटील यांच्या समर्थक नगरसेवकांनी केले. उद्घाटनाच्या जाहिराती व फलकही तयार केले; मात्र जाहिरातींसह उद्घाटन पत्रिकेत आमदार अमल महाडिक यांचे नाव वगळण्यात आल्याने प्रा. जयंत पाटील यांनी सूत्रे हाती घेत थेट अधिकाऱ्यांना जाब विचारला. उद्या, शुक्रवारी नागपूर अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हबकलेल्या प्रशासनाने काढता पाय घेत कारभाऱ्यांना उद्घाटनाबाबत विचार करण्याची विनंती केली. यानंतर घडलेल्या जोरदार हालचालीनंतर सतेज पाटील समर्थकांनी नियोजित जाहिरातींसह उद्घाटन समारंभच रद्द केला. घडल्या प्रकाराची उलटसुलट चर्चा सुरू झालीमाजी मंत्री पाटील यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये रस्ते दुरुस्ती व बांधणीसाठी रस्ते बांधणी अनुदानातून एक कोटी सतरा लाख व दोन कोटी असे मिळून ३.१७ कोटींचा निधी आणला. यातील २५ रस्त्यांच्या कामांसाठी आयुक्तांनी यापूर्वीच मंजुरी दिल्याची माहिती नगरसेवक चव्हाण व घाटगे यांनी आज पत्रकाद्वारे दिली. या रस्त्याच्या कामांच्या उद्घाटनावरून भविष्यात नाट्य घडणार असल्याची कुजबुज आहे. (प्रतिनिधी)विनोद तावडे यांच्या भाषणातून...शिक्षकांना कॅशलेस मेडिकल सुविधा देणार. शिक्षकांना त्यांच्यावरील उपचारासाठी बिले सादर करून नंतर केव्हातरी पैसे मिळतात. ही डोकेदुखी या निर्णयाने संपणार आहे. शालेय व महाविद्यालयीन शैक्षणिक निर्णयांची घोषणा दरवर्षी एप्रिलमध्येच होणार. कळवा; ठाणे येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची शासनाची भूमिका आहेच. पण त्याआधी गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात क्रीडा व कला केंद्र उभारता येईल का, याची चाचपणी करणार. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी बालमनोविकार तज्ज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ यांची एक समिती स्थापन करणार.२१ जूनला योग महोत्सव साजरा करणार.गोंदिया आणि चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. सतेज पाटील यांच्या रद्द झालेल्या नियोजित उद्घाटनांच्या रस्त्यांचे बुधवारी सकाळी उद्घाटन करण्याचा निर्णय आमदार महादेवराव महाडिक समर्थकांनी घेतला होता. यासाठी काल, बुधवारी सकाळी दहा वाजता महाडिक समर्थक सर्व नगरसेवक शाहूपुरीतील कार्यालयात जमले; मात्र ऐनवेळी उद्घाटनाचा बेत रद्द करण्याचे ठरले. याची दिवसभर नगरसेवकांत चर्चा सुरू होती.काही तांत्रिक कारणाने उद्घाटन पुढे ढकलेले असले तरी रस्त्यांचे नियोजित उद्घाटन सतेज पाटील यांच्या हस्तेच होणार आहे. पुढील आठवड्यात या सर्व रस्त्यांच्या कामाचे वाजत-गाजत ठरल्याप्रमाणे उद्घाटन सभारंभ करण्याचे नियोजन केले आहे. - सचिन चव्हाण, सभापती, स्थायी समिती