शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरावा सुरू ठेवा

By admin | Updated: November 15, 2014 00:14 IST

प्रवीण दराडे यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यांचा पाठपुरावा सुरू ठेवा, ज्या ठिकाणी माझी आवश्यकता असेल, त्या ठिकाणी मी निश्चित मदत करीन, अशा सूचना सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांनी आज, शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.दराडे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावरील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आपण कोल्हापुरात आलो. झालेल्या बैठकीत सर्व प्रश्नांची सूक्ष्म माहिती घेण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या स्तरावरील प्रलंबित असणारा विमानतळाचा प्रश्न आहे. त्याच्या सद्य:स्थितीबाबत माहिती घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. या सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शिस्त व पारदर्शकपणा यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भर आहे. त्यासाठी त्यांनी विभागनिहाय बैठका घेण्याचे निश्चित केले आहे. त्याची सुरुवात नागपूर येथून झाली आहे. त्यानंतर आता विभागनिहाय बैठका घेऊन मुख्यमंत्री विविध प्रश्नांचा आढावा घेणार आहेत.जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत झालेल्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल. या प्रश्नांबाबत राज्यस्तरावर निश्चित मार्ग निघेल. कोल्हापूर-कोकण रेल्वेबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली नसली तरी याबाबत मागणी आल्यास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पुणे विभागाच्या बैठकीत यावर निश्चित चर्चा केली जाईल. (प्रतिनिधी)नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बांधकामाची पाहणीमुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांनी बैठकीनंतर जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्यासमवेत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी केली. कामाचा वेग व दर्जा पाहून त्यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी संपूर्ण इमारतीच्या बांधकामाची फिरून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, उपअभियंता दिलीप कल्याणकर, आदी उपस्थित होते.