शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामे आजपासून पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे गेल्या महिनापासून कोल्हापूर शहरातील बांधकाम प्रकल्पांचे काम बंद आहे. या प्रकल्पांची कामे सोमवारपासून पुन्हा ...

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे गेल्या महिनापासून कोल्हापूर शहरातील बांधकाम प्रकल्पांचे काम बंद आहे. या प्रकल्पांची कामे सोमवारपासून पुन्हा सुरू होतील. पहिल्या टप्प्यात ५० प्रकल्पांचे काम सुरू होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने काही अटी घालून बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पांचे काम सुरू ठेवण्यास परवानगी दिली. त्यामध्ये मजूर, कामगारांना प्रकल्पाच्या ठिकाणी राहणे, जेवणाची व्यवस्था करण्याच्या अटींचा समावेश होता. त्यामुळे काही ठराविक प्रकल्पांचे काम सुरू होते. पुन्हा गेल्या आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू झाल्याने सर्व बांधकाम प्रकल्पांचे काम ठप्प झाले. आता कडक लॉकडाऊनपूर्वीच्या अटीनुसार सोमवारपासून बांधकामे पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय क्रेडाई कोल्हापूरच्या सदस्य असलेल्या बांधकाम व्यावसायिक, विकसकांनी घेतला आहे. प्रकल्पस्थळी कामगारांची व्यवस्था केलेल्या शहरातील ताराबाई पार्क, कसबा बावडा, फुलेवाडी रिंगरोड, नागाळा पार्क, आदी परिसरातील ५० बांधकाम प्रकल्पांचे काम सोमवारपासून सुरू होईल. त्यादृष्टीने आवश्यक तयारी बांधकाम व्यावसायिकांनी केली आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वी इमारतींच्या बेसमेंटचे काम करणे आवश्यक असते. शहरातील अशा विविध ठिकाणांवरील २२ इमारतींच्या बेसमेंटचे काम पूर्ण करावे लागणार आहे. या कामांसाठी महानगरपालिकेने लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी क्रेडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी रविवारी केली.

चौकट

बांधकाम साहित्याच्या दुकानांची वेळ वाढवावी

काम सुरू असलेल्या प्रकल्पांवर बांधकाम साहित्य संपत आले आहे. त्यामुळे शहरातील बांधकाम साहित्याची दुकाने एक तर दिवसभर सुरू ठेवावीत, अन्यथा त्यांना वेळ वाढवून द्यावा. बांधकाम प्रकल्पांवर काम करणाऱ्या मजूर, कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस देणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात ४५ वर्षांवरील मजूर, कामगारांचे लसीकरण करावे. महानगरपालिकेकडे येत्या दोन दिवसांमध्ये करणार असल्याचे बेडेकर यांनी सांगितले.