शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

गर्भलिंग चाचणीची कबुली

By admin | Updated: June 30, 2015 00:42 IST

संशयित डॉक्टरचे रॅकेट : शिरसेतील एजंटास अटक

कोल्हापूर : कासेगाव येथील दवाखान्यासह घरी व आलिशान मोटारीमध्ये सोनोग्राफी यंत्राद्वारे गर्भलिंग चाचणी केल्याची कबुली संशयित डॉक्टर विक्रम विलास आडके (वय ३५) याने दिली आहे. त्याने यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत एजंट नेमले आहेत. त्यापैकी शिरसे (ता. राधानगरी) येथील एका एजंटाला अटक केली आहे. संशयित गजेंद्र बापुसो कुसाळे (२७) असे त्याचे नाव असून, त्याच्या घराची झडती घेतली असता सोनोग्राफी यंत्र मिळून आले. आतापर्यंत याप्रकरणी पाचजणांनाअटक व दोन सोनोग्राफी यंत्रे जप्त केली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. आलिशान कारमध्ये गर्भलिंग चाचणी करणारे मोबाईल सोनोग्राफी यंत्र कासेगावचा डॉक्टर विक्रम आडके यांच्याकडून घेतल्याची कबुली संशयित डॉ. हिंदुराव पोवार याने पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी डॉ. आडके याला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केली असता कासेगाव येथील दवाखान्यात, मोटारीत व घरी गर्भलिंग चाचणी केली आहे. तसेच आणखी एक यंत्र गजेंद्र कुसाळे या एजंटाला दिले असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलीसांनी रविवारी रात्री कुसाळे याच्या घरी छापा टाकला असता, एका बॅगेमध्ये एका कंपनीचे चायनामेड सोनोग्राफी मशीन मिळून आले. यापूर्वी पोलिसांनी जप्त केलेले मशीन त्याच कंपनीचे आहे. त्यामुळे पुन्हा महापालिकेच्या वैद्यकीय पथकास पाचारण करण्यात आले. पथकाचे सदस्य डॉ. सुनंदा नाईक, योगिता भिसे, अजित पाटील हे पोलीस ठाण्यात आले. त्यांनी संबंधित यंत्राची पाहणी केली असता ते चायना बनावटीचे गर्भलिंग चाचणी करणारे सोनोग्राफी यंत्र असल्याचे स्पष्ट झाले, ते त्यांनी सील करून ताब्यात घेतले. दरम्यान, संशयित डॉ. आडके याचे सांगली, कोल्हापूर असे रॅकेट असून, त्यामध्ये डॉक्टर व एजंटाचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस संशयितांकडून कसून माहिती घेत आहेत. आडके याने आणखी किती यंत्रे सांगली, कोल्हापूर जिल्ह्णांत पुरविली आहेत. ती त्याने कोठून आणली, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.कळेत चौकशी पोवार व नाईक या डॉक्टरांच्या मोबाईलचे सीडीआर पोलिसांच्या हाती मिळाले असून, त्यावरून कळे (ता. पन्हाळा) येथील दोघा डॉक्टरांकडे पोलीस चौकशी करीत आहेत. पोवार व नाईक यांच्याशी लागेबांधे असणारे डॉक्टर, एजंट व गर्भलिंग चाचणी करून घेणाऱ्या जोडप्यांचे धाबे दणाणले आहेत.