शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

सवलतींचे स्वागत, मात्र जीआरमध्ये मेख मारू नका : चंद्रकांत पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 18:44 IST

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षणावरील स्थगिती उठविण्याची लढाई राज्य सरकारने लढली पाहिजे. आरक्षण मिळेपर्यंत या समाजाला जाहीर केलेल्या सवलतींचे मी स्वागत करतो, परंतु त्याची अंमलबजावणी करताना जीआरमध्ये मेख मारू नका म्हणजे झाले, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत लगावला.

ठळक मुद्दे सवलतींचे स्वागत, मात्र जीआरमध्ये मेख मारू नका. चंद्रकांत पाटील यांची टीका मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी लढावे

कोल्हापूर : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षणावरील स्थगिती उठविण्याची लढाई राज्य सरकारने लढली पाहिजे. आरक्षण मिळेपर्यंत या समाजाला जाहीर केलेल्या सवलतींचे मी स्वागत करतो, परंतु त्याची अंमलबजावणी करताना जीआरमध्ये मेख मारू नका म्हणजे झाले, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत लगावला.प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, जे ओबीसींना ते मराठ्यांना याप्रमाणे भाजपने आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ज्या सुविधा दिल्या होत्या, त्या सुविधा, तरी महाविकास आघाडीच्या सरकारने लगेच सुरू कराव्यात. त्यात ६४२ अभ्यासक्रमांचे शुल्क हे सरकारने भरावे. १० लाखांवरील कर्जाचे व्याज आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने भरावे.

सारथीला आर्थिक बळ द्यावे. आता मराठा समाजाचे जातीचे आरक्षण स्थगित झाल्याने आर्थिक आरक्षणात अर्ज करण्यासाठी या समाजाला परवानगी मिळावी, अशी आम्ही केलेली मागणी मंत्रिमंडळाने मान्य केली. मात्र, ज्या सवलती दिल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी सरकारने काटेकोरपणे करावी. नोकरशाही त्यामध्ये अडथळे आणणार नाही हे एक-दोन मंत्र्यांनी या सवलतींचे जीआर निघेपर्यंत पाहावे.नाथाभाऊ तर आमचेच हो..माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबतीत अनेक वेळा अफवा निर्माण होतात. नाथाभाऊ हे आमचे जुने, जाणते आणि ज्येष्ठ नेते आहेत. ते कधीही भाजपला नुकसान होईल असा निर्णय घेणार नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण