शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सौर कुंपणाच्या चौकशीसाठी समिती

By admin | Updated: November 21, 2014 00:31 IST

तीन गावांतील कुंपण : वनक्षेत्रपालांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

सावंतवाडी : वन्य प्राण्यांकडून होणारी नुकसानी टाळण्यासाठी वनविभागाने नेमळे, तळवडे व मळगाव या तीन गावांत लावलेल्या सौर कुंपणाच्या कामात अनियमितता आढळल्याने अखेर सावंतवाडी वनक्षेत्रपाल संजय पाटील यांना वनविभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. तसेच या प्रकरणी सहायक उपवनसंरक्षक शिरीष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.याबाबत माहिती अशी की, सन २०१३ ते २०१४ या कालावधीसाठी वनविभागाला जिल्हा नियोजन विभागातून ७५ लाखांचा निधी हा नेमळे, मळगाव व तळवडे या गावांच्या सीमेवर ज्या ठिकाणाहून वन्य प्राणी प्रवेश करतात, तेथे सौर कुंपण लावण्यासाठी दिला होता. मात्र, या निधीप्रमाणे प्रत्यक्षात जाग्यावर कामच झाले नाही. तसेच मळगाव, तळवडे, नेमळे येथे सौर कुंपणाच्या तारा या पोल जोडून टाकायच्या असतात. त्या झाडावरून जोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे अद्यापही वन्य प्राणी या परिसरात नुकसान करीत असल्याने शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांची भेट घेऊन संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या आंदोलनानंतर उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी या प्रकरणाची प्राथमिक स्तरावर चौकशी करून त्याचा अहवाल मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना पाठवला होता. या अहवालानंतर आज, गुरुवारी सावंतवाडी वनक्षेत्रपाल संजय पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबतचे आदेश येथील वनविभागाला प्राप्त झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पाटील यांना नोटीस बजावणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.वनक्षेत्रपाल पाटील यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणाला नोटीस बजावणार, याबाबत अद्याप निर्णय झाला नसून सौर कुंपणासाठी ७५ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी २५ लाख रुपये ठेकेदाराला अदा केल्याची माहिती प्राप्त झाली असून, उर्वरित धनादेश थांबवून ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)चौकशी सुरू : कुलकर्णी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहायक उपवनसंरक्षक शिरीष कुलकर्णी यांची नियुक्ती केली असून, आपण चौकशी सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बुधवारपर्यंत गावकऱ्यांसमवेत या कामाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.