शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरमधील लैंगिक अत्याचारप्रकरणी चौकशी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 16:29 IST

Muncipal Corporation Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठ वसतीगृह क्रमांक ३ मध्ये एका अल्पयीन निराधार मुलीवर झालेल्या लैगिंग अत्याचार प्रकरणी चौकशी करण्याकरिता प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.

ठळक मुद्देकोविड सेंटरमधील लैंगिक अत्याचारप्रकरणी चौकशी समिती प्रशासक कादंबरी बलकवडे यांची माहिती

कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठ वसतीगृह क्रमांक ३ मध्ये एका अल्पयीन निराधार मुलीवर झालेल्या लैगिंग अत्याचार प्रकरणी चौकशी करण्याकरिता प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.प्रशासक बलकवडे यांनीच शुक्रवारी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. कोविड सेंटरमध्ये घडलेला प्रकार अत्यंत दुदैवी आहे. पोलिस त्याचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.अनाथ मुलींचे संगोपन करणाऱ्या कोल्हापुरातील एका संस्थेतील काही मुलींना कोरोनाची लागण झाल्यानंतर महापालिकेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठ वसतीगृह क्रमांक ३ येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्यावेळी एक अल्पवयीन मुलीवर कोविड सेंटरमधील कंत्राटी वॉर्डबॉय अंकुश मच्छिंद्र पवार याचेकडून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला असल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून त्याला अटकही झाली आहे.एकीकडे पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असताना आता महानगरपालिका प्रशासनही घडलेल्या प्रकाराची चौकशी करणार आहे. त्याकरिता उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्यासह एक महिला वैद्यकिय अधिकाऱ्याची समिती नियुक्त केली आहे. ही चौकशी कोविड सेंटरमध्ये सुरक्षिततेच्या बाबत काही त्रुटी होत्या का ? तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते की नाही, कोविड सेंटर मधील कोणी जबाबदार आहे का ? हा प्रकार घडला तेंव्हा तेथे महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली होती की नाही या प्रशासकिय बाबींच्या अनुषंगाने असणार आहे.उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या समितीने चौकशीला सुरवात केली आहे. कोविड सेंटरची पाहणीही त्यांनी केली आहे. तेथील कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेतले जात आहेत. अत्याचारग्रस्त मुलीशीही त्या चर्चा करणार आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्त