शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

फेकून दे तो चहा : ...अन् समारंभातच आयुक्त कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:56 IST

पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे पदावरून महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रदूषणमुक्तीबाबत मार्गदर्शन करीत होते, याचवेळी उपस्थितांना प्लास्टिक कपांतून चहा देण्याचे काम सुरू होते. हे दृश्य पाहताच आयुक्त डॉ. कलशेट्टी कडाडले. त्यांनी, ‘फेकून दे ते चहाचे कप. चहा दिला नाहीस म्हणून काही बिघडणार नाही,’ असे सांगून चहा देणाऱ्या युवकास सभागृहाबाहेर काढले.

ठळक मुद्देफेकून दे तो चहा : ...अन् समारंभातच आयुक्त कडाडले प्लास्टिकच्या कपातून चहा देताना व्यासपीठावरून संतापले आयुक्त

कोल्हापूर : पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे पदावरून महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रदूषणमुक्तीबाबत मार्गदर्शन करीत होते, याचवेळी उपस्थितांना प्लास्टिक कपांतून चहा देण्याचे काम सुरू होते. हे दृश्य पाहताच आयुक्त डॉ. कलशेट्टी कडाडले. त्यांनी, ‘फेकून दे ते चहाचे कप. चहा दिला नाहीस म्हणून काही बिघडणार नाही,’ असे सांगून चहा देणाऱ्या युवकास सभागृहाबाहेर काढले.राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये रविवारी सायंकाळी एका पुरस्कार वितरण समारंभात महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पुरस्कर प्रदान केल्यानंतर प्रदूषणासंबंधी मार्गदर्शन करण्यास प्रारंभ केला. त्याचवेळी उपस्थितांना प्लास्टिकच्या कपांतून चहा देण्यासाठी एक युवक सभागहृात आला. त्याच वेळी व्यासपीठावरूनच आयुक्त डॉ. कलशेट्टी त्याच्यावर कडाडले.

‘फेकून दे तो प्लास्टिकचा चहाचा कप. आम्ही दिवसभर प्लास्टिकविरोधी जागृती करायची अन् तुम्ही प्लास्टिकच्या कपातून चहा वाटता, हे योग्य नाही. चहा नाही दिला म्हणून काही बिघडत नाही,’ असे म्हणत त्यांनी चहावाल्याला सभागृहातून बाहेर हाकलत ‘विल्हेवाट लाव त्या कपांची,’ असा सल्ला दिला. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे सभागृह काहीवेळ भांबावून गेले.प्रबोधनातून राष्ट्र उभारले आहे. आपण स्वच्छता करणारे आहोत, घाण करणारे नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, असे सांगून ते म्हणाले, जयंती नाल्यातून रोज आम्ही कचरा काढत आहोत, चहा द्यायचाच असेल तर कपबशीतून द्या. जिल्ह्याबरोबर भारतही प्लास्टिकमुक्त झाला पाहिजे, हे प्रत्येकाने स्वप्न बाळगावे.

आमची हद्द नसतानाही आम्ही गांधीनगरमध्ये जाऊन प्लाास्टिकबाबत कारवाई केली. आजच मंडईतही फेरफटका मारताना भाजी मंडईही प्लास्टिकमुक्त झाल्याचे लक्षात आले. भाजीवाल्या ग्रामीण महिलांत जागृती झाली, आता तुम्हीही सुधारा, असाही त्यांनी सज्जड दम दिला.ट्रॉफीनिर्मात्यावरही कारवाईआयुक्त डॉ. कलशेट्टी हे ज्या पुरस्कार वितरण समारंभास आले, त्या कार्यक्रमात पुरस्कार देताना ट्रॉफीला पॅकिंगसाठी प्लास्टिकचा कागद गुंडाळला होता. त्यावरही त्यांनी ताशेरे ओढले. ट्रॉफीची निर्मिती करणाऱ्यावरही कारवाई करणार असल्याचाही त्यांनी सज्जड दमच दिला. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तPlastic banप्लॅस्टिक बंदीkolhapurकोल्हापूर