कोतोली येथे विकासकामांचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:23 IST2021-01-22T04:23:28+5:302021-01-22T04:23:28+5:30

करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील पश्चिम परिसरातील कोतोली बाजारपेठेला जोडणारा व तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सोईचा ठरणारा मानेवाडी ते खेडखोळवाडी हा ...

Commencement of development work at Kotoli | कोतोली येथे विकासकामांचा प्रारंभ

कोतोली येथे विकासकामांचा प्रारंभ

करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील पश्चिम परिसरातील कोतोली बाजारपेठेला जोडणारा व तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सोईचा ठरणारा मानेवाडी ते खेडखोळवाडी हा प्रमुख वाहतुकीचा रस्ता अनेक दिवसांपासून खराब झाल्याने वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत होता.या रस्त्याच्या कामासाठी लोकमत मधून वेळोवेळी आवाज उठवला होता.या कामाला जि.प.निधीतून मंजुरी मिळाली आहे.या कामाचा शुभारंभ आमदार डाॅ. विनय कोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.या रस्त्याचे तीनशे मीटरपर्यंतचे डांबरीकरणाचे काम होणार आहे.यावेळी अंगणवाडी इमारतीच्या कामाचे उद्घाटन देखील करण्यात आले.यावेळी जि.प.सदस्य शंकर पाटील,उपसभापती रश्मी कांबळे,उपसरपंच राजेंद्र लव्हटे,बाबूराव खोत,सुनील चौगले,वैभव पाटील,सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.

२१ कोतोली वर्क

फोटो : कोतोली (ता.पन्हाळा)येथील भारचवाडी रस्त्याचे व अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन आ.विनय कोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Web Title: Commencement of development work at Kotoli