शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चला, निवडूया अचूक करिअर

By admin | Updated: June 12, 2015 00:45 IST

तज्ज्ञांचे मार्गदर्शन : ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चे आयोजन

कोल्हापूर : करिअरविषयक अनेक प्रश्नांसाठी अचूक उत्तर असलेले ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन शनिवार (दि. १३) ते सोमवार (दि. १५) दरम्यान कोल्हापूरमध्ये होणार आहे. प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्थंभूत माहिती ‘एकाच छताखाली’ उपलब्ध होणार आहे. ‘लोकमत’ समूहाने ‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले आहे. कोल्हापूरमधील राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात हे प्रदर्शन होईल. पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरसाठीच्या, शिक्षणाविषयीच्या अनेक शंका, प्रश्न असतात. त्यांचे निराकरण आणि प्रश्नांना अचूक उत्तरे या प्रदर्शनात मिळतील. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचा श्रम, वेळ आणि पैसा वाचणार आहे. या प्रदर्शनामध्ये राज्यातील मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटिरिअर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरिन लँग्वेजेस, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट आदी विविध क्षेत्रांतील नामांकित शैक्षणिक संस्था तसेच महाविद्यालये सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)मिळणार ‘करिअर बुक’या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनीला ‘लोकमत’तर्फे ‘करिअर बुक’ मोफत देण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक तासाला लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, यातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.