शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

दिवाळीच्या तोंडावर खोबरे महागले: टोमॅटो, केळीचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:11 AM

दिवाळीच्या तोंडावर सुके खोबरे महागले असून, ते २०० रुपये किलो झाले आहे; तर आवक घटल्याने टोमॅटो व केळीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे चित्र आहे. ३० रुपये किलो दराच्या टोमॅटोचा दर बाजारात ५० रुपयांवर पोहोचला आहे; तर केळीचा दर ३० रुपयांवरून ८० रुपये डझनवर गेला आहे. सीताफळांचीही आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, त्यांचा दर ८० रुपये किलो आहे.

ठळक मुद्दे दिवाळीच्या तोंडावर खोबरे महागले: टोमॅटो, केळीचे दर वाढलेआवक घटल्याचा परिणाम : सीताफळांची आवक वाढली

कोल्हापूर : दिवाळीच्या तोंडावर सुके खोबरे महागले असून, ते २०० रुपये किलो झाले आहे; तर आवक घटल्याने टोमॅटो व केळीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे चित्र आहे. ३० रुपये किलो दराच्या टोमॅटोचा दर बाजारात ५० रुपयांवर पोहोचला आहे; तर केळीचा दर ३० रुपयांवरून ८० रुपये डझनवर गेला आहे. सीताफळांचीही आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, त्यांचा दर ८० रुपये किलो आहे.तोंडावरच येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीची लगबग बाजारामध्ये दिसत आहे. असे असले तरी या खरेदीला अजून जोर नसल्याचे दिसत आहे. दिवाळीच्या फराळामध्ये महत्त्वाचा घटक असलेले सुके खोबरे महागले आहे. टोमॅटोची व केळांची आवक घटल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे.

बाजारात सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, त्याचा दर ८० रुपये किलो आहे. त्याचबरोबर सफरचंदांचा दर ७० ते १०० रुपये किलो व पेरू १०० रुपये किलोवर पोहोचला आहे. धान्य व कडधान्यांमध्येही गत आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. यात मूग ७२ रुपये प्रतिकिलोवरून ८० रुपयांवर, मटकी ११० रुपये किलोवरून १२० रुपयांवर, पांढरे वांगे ७० रुपयांवर ८० रुपये किलोवर गेले आहे. तसेच पेरणीच्या धनेच्या दरात दुप्पट वाढ झाली असून ५० रुपये किलोवरून ते १०० रुपयांवर गेले आहे.

मक्याचा दर मात्र गत आठवड्याच्या तुलनेत कमी झाला असून, तो प्रतिकिलो २६ रुपयांवर १७ रुपयांपर्यंत खाली आला आहे. गव्हाच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली असून तो ३७ रुपये किलो दरावर पोहोचला आहे. ज्वारी ३२ रुपयांवरून ३७ रुपये प्रतिकिलो दरावर पोहोचली आहे.

काकडीचा दर ३० रुपये किलो, दोडका ४० रुपये, हिरवा वाटाणा १०० रुपये, गवार ८० रुपये, ओल्या भुईमुगाच्या शेंगा ६० रुपये, हिरव्या मिरच्या ४० रुपये, भेंडी ४० रुपये, शेपू १० रुपये पेंढी, मेथी १५ रुपये पेंढी असा दर राहिला आहे.

कांदा ३५ रुपये किलोकांद्याचा दर ३० रुपयांवरून ३५ रुपये किलो झाला आहे. बटाट्याचा दर २५ रुपये किलोवर पोहोचला आहे. लसणाचा दर १६० रुपये किलो असा झाला आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर