शिवाजी पुलाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:16 IST2021-07-04T04:16:59+5:302021-07-04T04:16:59+5:30

कोल्हापूर : महापालिका आणि युथ सोशल पॉवर ग्रुपतर्फे शनिवारी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पुलाची स्वच्छता करण्यात आली. युथ सोशल पॉवर ...

Cleaning of Shivaji Bridge | शिवाजी पुलाची स्वच्छता

शिवाजी पुलाची स्वच्छता

कोल्हापूर : महापालिका आणि युथ सोशल पॉवर ग्रुपतर्फे शनिवारी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पुलाची स्वच्छता करण्यात आली. युथ सोशल पॉवर ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.

सध्या नवीन पर्यायी पुलामुळे जुन्या पुलावरील वर्दळ बंद आहे. या पुलावर झाडेझुडपे, प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे स्वच्छता मोहीम राबवून ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी महापालिकेचे उप आयुक्त निखिल मोरे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार, आरोग्य निरीक्षक शुभांगी पवार, युथ सोशल पॉवर ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

फोटो : ०३०७२०२१-कोल- शिवाजी पूल स्वच्छता

कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पुलाची स्वच्छता शनिवारी महापालिका आणि युथ सोशल पॉवर ग्रुपतर्फे करण्यात आली.

Web Title: Cleaning of Shivaji Bridge