शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मंडलिकांच्या गुगलीने कागलमध्ये खळबळ

By admin | Updated: October 31, 2016 00:14 IST

दबावाचे राजकारण : ‘हमीदवाडा’ निवडणुकीची किनार; विधानसभेसाठी वेगळीच समीकरणे दिसणार...

कोल्हापूर : कागल व मुरगूड नगरपालिका निवडणुकांच्या राजकारणाने चांगलीच उसळी खाल्ली असून, प्रा. संजय मंडलिक यांच्या गुगलीने कागल तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मंडलिक यांच्या भूमिकेमागे दबावाचे राजकारण असले तरी हमीदवाडा साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीची किनारही त्यात पाहावयास मिळत आहे. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीपासून कागलमधील राजकारण बदलत गेले. आमदार हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांच्याशी जुळवून घेत दोन्ही गटांतील संघर्षाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही गटांतील संवाद वाढत गेला आणि भावनिकतेचे वातावरण तयार झाले. दोन्ही गट एकत्र येणे ही दोघांचीही राजकीय अपरिहार्यता आहे. समरजितसिंह घाटगे यांनी भाजपशी घरोबा केल्याने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे मंडलिक गटाशी जुळवून घेणेच त्यांच्या दृष्टीने फायद्याचे होते. गत लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना कागलमधूनच मुश्रीफ यांनी टोकाचा विरोध केल्याने त्याचा फटका बसला. मुश्रीफ गटाशी असलेली संघर्षाची धार कमी करून त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत करून घेण्याचा मंडलिक यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे वर्षभरातील हालचाली पाहता आगामी काळात दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा होती. त्याची सुरुवात नगरपालिका निवडणुकीपासून झाली. मुश्रीफ व प्रा. मंडलिक यांच्यात चर्चा झाली. प्रा. मंडलिक यांनी दोन्ही गटांशी चर्चा करीत राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत गुगली टाकल्याने कागल तालुक्यात खळबळ उडाली आहे. मंडलिक यांच्या या भूमिकेने कागलच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार, हे मात्र निश्चित आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वेगळी समीकरणे उदयास आली तर आश्चर्य नको, अशीच चर्चा सुरू आहे. दोन कारणे : दबाव आणि कारखान्याची निवडणूक कळीचा मुद्दा... ४शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब होऊनही मंडलिक यांनी बाबगोंडा पाटील व चंद्रकांत गवळी यांच्या माध्यमातून मुश्रीफ गटाशी चर्चा सुरू ठेवली. ४यामागे दोन कारणे असू शकतात. त्यातील पहिले म्हणजे मुश्रीफ यांच्याशी चर्चा सुरू ठेवून भाजपचे समरजितसिंह घाटगे यांच्यावर दबाव टाकायचा. ४तसेच आपल्या पदरामध्ये जास्त जागा पाडून घ्यायच्या. ४दुसरे, हमीदवाडा कारखान्याची निवडणूक तोंडावर आली आहे. तिथे मुश्रीफ गट विरोधात आहे, नगरपालिकेच्या माध्यमातून आघाडी करून ‘हमीदवाडा’ बिनविरोध करण्याची व्यूहरचनाही प्रा. मंडलिक यांची असू शकते.