शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

चिल्लर पार्टीसाठी नऊ महिन्यांनंतर उघडणार सिनेमाचा पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 10:55 IST

cinema Kolhapur- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी छोट्या मुलांसाठी दाखविण्यात येणाऱ्या सिनेमांचे प्रदर्शनही थांबवण्यात आले होते. मात्र, या काळात तब्बल ४८ बालचित्रपट ऑनलाइन दाखविण्यात आले होते. आता २८ फेब्रुवारीपासून चिल्लर पार्टीसाठी हा सिनेमाचा प्रत्यक्ष पडदा पुन्हा उघडणार आहे. गेली नऊ महिने प्रत्यक्ष चित्रपटगृहातील सिनेमांचे प्रदर्शन बंद होते.

ठळक मुद्देचिल्लर पार्टीसाठी नऊ महिन्यांनंतर उघडणार सिनेमाचा पडदा लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन दाखवले जगभरातील ४८ बालचित्रपट

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी छोट्या मुलांसाठी दाखविण्यात येणाऱ्या सिनेमांचे प्रदर्शनही थांबवण्यात आले होते. मात्र, या काळात तब्बल ४८ बालचित्रपट ऑनलाइन दाखविण्यात आले होते. आता २८ फेब्रुवारीपासून चिल्लर पार्टीसाठी हा सिनेमाचा प्रत्यक्ष पडदा पुन्हा उघडणार आहे. गेली नऊ महिने प्रत्यक्ष चित्रपटगृहातील सिनेमांचे प्रदर्शन बंद होते.लॉकडाऊनच्या काळातही चिल्लर पार्टीच्या छोट्यांसाठी सिनेमा दाखविण्याच्या उपक्रमात खंड पडला नव्हता. ऑनलाइन पद्धतीने पालकांचे व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करून त्या माध्यमातून दर रविवारी बालचित्रपटांच्या लिंक पाठवल्या. कोल्हापुरातीलच नव्हे तर जगभरातील दोन हजार पालक आणि मुले या माध्यमातून सहभागी झाले. या काळात जगभरातील एकूण ४८ बालचित्रपटांची पर्वणी छोट्या मुलांबरोबर पालकांनाही मिळाली.व्हिडिओच्या माध्यमातून कलाकारांनी साधला संवादयानिमित्त चिल्लर पार्टीच्या व्यासपीठावरून अभिनेता सागर तळाशीकर, स्वप्नील राजशेखर, आनंद काळे, शशांक शेंडे, समिधा गुरू, चंद्रकांत जोशी, दिलीप बापट, प्रभाकर वर्तक, शरद भुताडीया, संजय मोहिते, भरत दैनी, विद्यासागर अध्यापक, रेहान नदाफ, अनुप बेलवलकर, रोहित हळदीकर, अजय कुरणे आदी कलाकारांनी व्हिडिओच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधला. हे व्हिडिओ चिल्लर पार्टीच्या फेसबुक आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरून प्रसारित करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 

चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी छोट्या मुलांसाठी विनामूल्य सिनेमा दाखविण्यात येतात. लॉकडाऊननंतर आता फेब्रवारी महिन्यापासून पुन्हा शाहू स्मारक भवन येथे सिनेमे दाखविण्यात येणार आहेत. या उपक्रमात मोठ्या संख्येने छोट्यांनी सहभागी व्हावे आणि जगभरातील बालचित्रपटांचा आनंद घ्यावा.-मिलिंद यादव,चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ

टॅग्स :cinemaसिनेमाkolhapurकोल्हापूर