शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

नाताळची तयारी वेगात

By admin | Updated: December 19, 2014 23:22 IST

शहरातील वायल्डर मेमोरियल चर्चसह अन्य चर्चमध्ये सजावटीच्या रंगरंगोटीच्या कामाने वेग घेतला आहे़

कोल्हापूर : ख्रिस्त बांधवांच्या परमोच्च आदराचे प्रतीक असलेला नाताळ सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे़ नाताळ हा प्रभू येशूंचा जन्मदिवस असल्यामुळे शहरातील ख्रिस्त बांधवांच्या उत्साहाला उधाण आले आहे़ या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये ख्रिसमस ट्री, केक आणि डोनट तसेच फराळ आणि कपड्यांच्या खरेदीसाठी ख्रिस्त बांधवांचा उत्साह टिपेला जात आहे़ शहरातील वायल्डर मेमोरियल चर्चसह अन्य चर्चमध्ये सजावटीच्या रंगरंगोटीच्या कामाने वेग घेतला आहे़नाताळनिमित्त मिठाई आणि विद्युतरोषणाईसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत़ विविध आकाराच्या रंगीबेरंगी विद्युत माळा, नाताळाच्या शुभेच्छा देणारे विविध आकाराचे केक शहरातील बेकरीमध्ये उपलब्ध आहेत़ ख्रिस्त बांधवांनी आपआपल्या घरीच फराळ तयार करण्यासाठी फराळासाठी लागणारे विविध पदार्थ खरेदी केले आहेत़नाताळला अवघे काही दिवस राहिल्याने शहरातील चर्च तसेच ख्रिस्त बांधवांच्या उत्साह वाढला आहे. शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही न चुकता सायंकाळी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमत आहेत़ महापालिकेजवळील चर्चमध्ये प्रभू येशूची प्रार्थना, संदेश आणि उपासना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ येथील सेंट झेव्हियर्स स्कूलमध्ये नाताळ सणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांताक्लॉझचे मुलांना मोठे आकर्षण असून, त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा सण बच्चेकंपनीचा आनंद द्विगुणीत करणारा आहे. न्यू शाहूपुरीमधील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही नयनरम्य रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.नाताळच्या शुभेच्छा देणारी पत्रेही बाजारात दाखल झाली आहेत. नाताळ सणानिमित्त ख्रिस्त बांधव खरेदी करण्यात दंग झाले आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. सर्वत्र नाताळ सणाचा माहोल पहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)