शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात साखरेने ओलांडली चाळिशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2017 18:53 IST

कडधान्य, भाजीपाल्याचे दर स्थिर : फळबाजार अद्याप थंडच

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १६ : साखरेच्या दरात हळूहळू वाढ होत असून, या आठवड्यात साखरेने चाळिशी ओलांडली आहे. किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४२ रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे. कडधान्ये, भाजीपाल्याच्या दरांत फारशी चढउतार दिसत नाही. कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली असून मेथी, पालक, पोकळ्याचे दर मात्र स्थिर आहेत. फळबाजार अद्याप शांतच आहे. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामापासून गेले सहा महिने घाऊक बाजारात साखरेचा दर ३३ ते ३६ प्रतिकिलोपर्यंत राहिला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही ३९ रुपयांपर्यंत साखर जाऊन थांबली; पण गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने साखरेवरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या आयातीवर बऱ्यापैकी निर्बंध येणार आहेत. त्याचा तत्काळ परिणाम साखरेच्या दरावर झाल्याचा दिसून येत आहे. सध्या घाऊक बाजारात साखर ४० रुपये, तर किरकोळ बाजारात ४२ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आगामी काळातही सणांच्या पार्श्वभूमीवर आणखी दरात दोन-तीन रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कडधान्य बाजार तुलनेत स्थिर आहे. तूरडाळ ७०, हरभराडाळ ७२ रुपये आहे. सरकी तेल ७०, तर शाबू ८० रुपयांवर कायम आहे. ‘जीएसटी’मुळे अजूनही व्यापारी गोंधळले असल्याने त्याचा थेट फटका कडधान्य बाजारावर दिसत आहे. एकूणच पावसाळा व जीएसटी यांमुळे कडधान्य बाजार शांत दिसत आहे. भाजीपाल्यामध्ये कोबी, वांगी, ढब्बूची आवक स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. घेवडा व गवारीची आवक काहीशी मंदावल्याने दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक मर्यादित असल्याने दर कडाडले आहेत. घाऊक बाजारात ७० रुपयांसून १२० रुपये किलोपर्यंत वाटाणा झाला. कारली, भेंडी, वरणा, दोडक्याची आवक स्थिर आहेत. कोथिंबिरीच्या दरात थोडी वाढ झाली असली तरी कांदापात, मेथी, पालक व पोकळा फारशी चढउतार दिसत नाही. फळ मार्केट अद्याप शांतच दिसत आहे. मोसंबी, संत्री, चिक्कंूची आवक मर्यादित आहे. पेरू व डाळिंबांची आवक चांगली आहे. ‘दशेरी’ आंबा तुरळक पाहावयास मिळत आहे. आणखी पंधरा दिवस श्रावण सुरू झाल्यानंतरच फळबाजाराला तेजी येण्यास लागणार आहे.

कांदा-बटाटा स्थिर!

बाजार समितीत आठवड्याला साधारणत: २५ हजार क्विंटल कांद्याची, तर १५ हजार क्विंटल बटाट्याची आवक होते. आवक व मागणी स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही.