विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:22 IST2021-03-14T04:22:52+5:302021-03-14T04:22:52+5:30

निपाणी : हंचिनाळ येथील कोडी मळ्यात घराशेजारी असलेल्या विहिरीजवळ खेळत असताना त्यात पडल्याने बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ...

Child dies after falling into well | विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

निपाणी : हंचिनाळ येथील कोडी मळ्यात घराशेजारी असलेल्या विहिरीजवळ खेळत असताना त्यात पडल्याने बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. शनिवारी सकाळी बालकाचा मृतदेह विहिरीत आढळून आला. वेदांत कृष्णा घाडगे (वय ८) असे मृत बालकाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, हंचिनाळ येथील कोडी मळ्यात कृष्णा घाडगे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. कृष्णा घाडगे यांचा मुलगा वेदांत व कृष्णा यांच्या बहिणीचा मुलगा प्रज्वल हे दोघे घराशेजारी खेळत होते. खेळता-खेळता घराशेजारी असलेल्या सुंदर जाधव यांच्या विहिरीत वेदांत पडला होता. यानंतर प्रज्वल याने घरात जाऊन हकिकत सांगितली होती; पण तोपर्यंत वेदांत हा विहिरीत पूर्णपणे बुडाला होता. या घटनेची माहिती निपाणी ग्रामीण पोलिसांना देण्यात आली होती.

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती न लागल्याने शनिवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवली होती. यावेळी वेदांत याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद झाली असून, अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Child dies after falling into well