शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

टोलमुक्ती संदेशाने मुख्यमंत्री हैराण

By admin | Updated: November 27, 2014 00:50 IST

बॅटरी होतेये डिस्चार्ज : कोल्हापूरकरांचा नाद खुळा

कोल्हापूर : आजवर विविध आंदोलनांच्या माध्यमातून टोलमुक्तीसाठी लढा देणाऱ्या कोल्हापूरकरांनी आज, बुधवारी आंदोलनाचा अनोखा फंडा वापरला़ थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिस्ड कॉल आणि एसएमएस करून टोलमुक्तीचे गाऱ्हाणे मांडले़ कोल्हापूरकरांच्या या नाद खुळ्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांच्या मोबाईलची ‘बॅटरी’ डिस्चार्ज झाली नाही तरच नवल!रविवार पेठेत लागलेल्या एका अनोख्या बॅनरने अख्ख्या शहराचे आणि मीडियाचेही लक्ष वेधले़ ‘आपला एक एस.एम.एस. कोल्हापूर टोलमुक्त करू शकतो,’ असा फलक बिंदू चौकात लावण्यात आला होता़ त्याखाली मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोबाईल क्रमांकही देण्यात आला होता़ मग काय, दिसेल त्याने आपल्या मोबाईलवरून थेट मुख्यमंत्र्यांनाच ‘रिंग’ दिली़ तर अनेकांनी एसएमएस पाठवून टोलमुक्त करण्याची मागणी केली़ मुख्यमंत्र्यांनी कोणाचाही मोबाईल घेतला नाही. ‘लोकमत’नेही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यावेळी मोबाईल स्वीच आॅफ असल्याचे आढळून आले़ एकीकडे रंगणारा खडसे-ठाकरे वाद अन् दुसरीकडे शिवसेनेच्या सत्तासहभागाबाबत दिल्लीकडे लागलेले मुख्यमंत्र्यांचे लक्ष... अशा स्थितीत कधी काय ‘मेसेज’ येईल, याबाबत सतर्क असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांचा आजचा दिवस गाजवला तो कोल्हापूरकरांनी! या उपक्रमाबद्दल बोलताना संयोजक महेश ढवळे म्हणाले, कोल्हापूरचा टोल हटविल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. हा एक टप्पा असून, यासाठी आम्ही यावेळी सोशल मीडियाचा वापर करीत आहोत. शहरातील विविध ‘व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप’च्या माध्यमातून आम्ही या उपक्रमाबाबत जनजागृती करणार आहोत. एक लाख एसएमएस तरी आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहोत. (प्रतिनिधी) हजारो एसएमएसदिवसभर येणाऱ्या हजारो एसएमएसमुळे त्यांच्या मोबाईलची ‘बॅटरी’ डिस्चार्ज झाली असावी़ खरे तर मुख्यमंत्री आज दिवसभर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत होते़ त्यामुळे काही काळ त्यांचा मोबाईल बंदच होता़