सरन्यायाधीश, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या कोल्हापुरात; सर्किट बेंचचे होणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 16:14 IST2025-08-16T16:12:28+5:302025-08-16T16:14:13+5:30

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी करवीर नगरी सज्ज

Chief Justice, Chief Minister and both Deputy Chief Ministers to visit Kolhapur tomorrow; Circuit Bench to be inaugurated | सरन्यायाधीश, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या कोल्हापुरात; सर्किट बेंचचे होणार उद्घाटन

सरन्यायाधीश, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या कोल्हापुरात; सर्किट बेंचचे होणार उद्घाटन

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्या, रविवारी कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे यांच्यासह मान्यवर कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी करवीर नगरी सज्ज झाली आहे.

गेल्या ४२ वर्षांच्या लढ्यानंतर अखेर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंचचे स्वप्न सत्यात उतरत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फित कापून सीपीआरसमोरील सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन होईल. त्यानंतर मेरी वेदर ग्राऊंडवर उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. 

वाचा - ‘कोल्हापूर सर्किट बेंच’साठी चार न्यायमूर्तीं; सोमवारपासून कामकाजास प्रारंभ

सर्किट बेंच उद्घाटन समारंभासाठी मंत्री, सहा जिल्ह्यातील वकिल, नागरिक असे सुमारे पाच हजार जण उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सीपीआरसमोरील सर्किट बेंच परिसर आणि मेरी वेदर ग्राऊंडवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसह बंदोबस्त तैनात केला आहे.

वाचा- Kolhapur Circuit Bench: लढ्यास यश; आंदोलकांवरील खटले अजून सुरूच!

Web Title: Chief Justice, Chief Minister and both Deputy Chief Ministers to visit Kolhapur tomorrow; Circuit Bench to be inaugurated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.