शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

'माझे वडील ५० वर्षं मर्सिडीजमधून फिरताहेत, हवं तर बॅलन्स शीट देतो!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 11:45 IST

गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे काहीही प्रश्न सुटले नाहीत. निधी मिळाला नाही.

ठळक मुद्देशिरोलीकरांचे ऐकूनच चंद्रकांत पाटील अडचणीत :सतेज पाटीलमाझे वडील ५० वर्षे मर्सिडीजमधून फिरताहेत, चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर

कोल्हापूर : शिरोलीकरांचे ऐकूनच चंद्रकांत पाटील नेहमी अडचणीत येतात, असा टोला लगावतानाच पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘माझे वडील डी. वाय. पाटील गेली ५० वर्षे मर्सिडीज गाडीतून फिरतात. तुम्हा पाहिजे तर बॅलन्स शीट देतो,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकारी निवडीवेळी ‘फाईव्ह स्टार हॉटेल उभारायला बंटी पाटील यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले?’ अशी विचारणा केली होती. त्याला सतेज पाटील यांनी गुरुवारी प्रत्युत्तर दिले. जिल्हा परिषदेच्या निवडीसाठी पाटील सकाळी कोल्हापुरात आले.मंत्री पाटील म्हणाले, ज्या कार्यक्रमात माझ्या आणि मुश्रीफ यांच्याविरोधात बोला, अशी चिठ्ठी कुणी दिली, याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे पाटील यांनी पहिल्यांदा शिरोलीकरांचे ऐकणे बंद करायला पाहिजे. माझी खात्रीलायक माहिती आहे की, त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या कुणी त्यांना ही चिठ्ठी दिली आणि आमच्या टीका करायला लावली.गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे काहीही प्रश्न सुटले नाहीत. निधी मिळाला नाही. काही प्रगती झाली नाही. त्यामुळे सहकारी मंत्री हसन मुश्रीफ आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सहकार्यातून जिल्ह्यासाठी मोठा निधी आणणार आहे. चंद्रकांत पाटील हे सत्ता गेल्यामुळे हवालदिल झाले आहेत.थेट पाईपलाईनबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार नाहीमुळात थेट लाईनबद्दल बोलण्याचा चंद्रकांत पाटील यांना काहीही अधिकार नाही, असा आरोप सतेज पाटील यांनी यावेळी केला. ते म्हणाले, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी जर थेट पाईपलाईनचे काम सुरू झाले नाही तर मी निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले होते.

आम्ही योजनेसाठी ४२५ कोटी रुपये मंजूर केले. काम सुरू केले. परंतु चंद्रकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत यासाठी एकही आढावा बैठक घेतली नाही. निधी दिला नाही. काहीही केले नाही. त्यामुळे याबाबत बोलण्याचा त्यांना काहीएक अधिकार नाही.बॅलन्स शीट पाठवून देतोआम्ही कधीही वैयक्तिक आरोप केले नाहीत. आम्ही राजकीय आरोप जरूर करतो; परंतु चंद्रकांत पाटील यांनी खालच्या पातळीवर जाऊन आरोप सुरू केले आहेत. आता त्यांना हॉटेल कसे बांधले याचे बॅलन्स शीटच पाठवून द्यावे लागेल. म्हणजे त्यांना कळेल की कुठल्या बॅँकांकडून किती कर्ज घेतले ते. भाजपसारख्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले पाटील गल्लीतील आरोप करताहेत, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर