चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, ललित गांधी प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:52+5:302021-02-05T06:54:52+5:30

सतेज पाटील पालकमंत्री कोल्हापूर हा अर्थसंकल्प समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा आहे. कोरोना साथीत लोकांचे आरोग्य धोक्यात आले त्याची ...

Chandrakant Patil, Satej Patil, Lalit Gandhi reaction | चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, ललित गांधी प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, ललित गांधी प्रतिक्रिया

सतेज पाटील

पालकमंत्री कोल्हापूर

हा अर्थसंकल्प समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा आहे. कोरोना साथीत लोकांचे आरोग्य धोक्यात आले त्याची नोंद घेऊन आरोग्यासाठी भरभक्कम तरतूद केली आहे. पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर दिला आहे. नाशिक व नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी चांगली आर्थिक तरतूद केली आहे. शेतीच्या कर्जपुरवठ्याची मर्यादा वाढविण्यात आली आहे. पिकांच्या बाबतीत मूल्यवर्धन व निर्यातसाठीच्या योजनेचा विस्तार करून ती २२ पिकांना लागू केली आहे.

आमदार चंद्रकांत पाटील

प्रदेशाध्यक्ष

भाजप महाराष्ट्र

हा अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देऊ शकेल. सरकारी कंपन्या व उद्योगातील निर्गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. पेट्रोल-डिझेलसह विविध वस्तूवर लावलेला अधिभार महागाई वाढविण्यास कारणीभूत ठरेल अशी भीती वाटते. नेहमीप्रमाणेच किरकोळ व्यापारी क्षेत्राची उपेक्षा करण्यात आली आहे. नागपूर-नाशिक मेट्रोसाठी मदत करणाऱ्या केंद्र सरकारने कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेसाठी काहीच दखल घेतलेली नाही.

ललित गांधी

वरिष्ठ उपाध्यक्ष

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

Web Title: Chandrakant Patil, Satej Patil, Lalit Gandhi reaction