शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

चंदगड तालुका संघाची १०० कोटींपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:24 IST

चंदगड : अवसायनात गेलेल्या चंदगड तालुका संघाने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत महाराष्ट्र शासनाचा ‘सहकार भूषण’ पुरस्कार मिळविला आहे. ...

चंदगड : अवसायनात गेलेल्या चंदगड तालुका संघाने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत महाराष्ट्र शासनाचा ‘सहकार भूषण’ पुरस्कार मिळविला आहे. संघाची वार्षिक उलाढाल १०० कोटींच्या पुढे न्यायचा संकल्प आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केला. चंदगड तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघातर्फे हलकर्णी फाटा येथे आयोजित ऑनलाईन सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालकीची दौलत असावी, यासाठी नरसिंगराव पाटील यांनी आपले बलिदान दिले. 'दौलत'च स्वत:चे मूल समजत. तो दौलत कारखाना सभासद, शेतकऱ्यांच्या मालकीचा करणे, हेच नरसिंगरावांचे उचित स्मारक असून, त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.

संघाचे व्यवस्थापक एस. वाय. पाटील यांनी प्रास्ताविकात संघाची यशस्वी घोडदौड सुरू असून, १५ शाखांचे व्यवहार एक कोटीपेक्षा अधिक असल्याचे जाहीर केले.

चर्चेत अनिल सुरूतकर, बंडू चिगरे, भिकू गावडे, भीमराव चिमणे, महादेव प्रसादे, विष्णू पाटील यांनी भाग घेतला. प्रत्येक शाखेच्या ठिकाणी इमारत बांधावी, अशी सूचना भिकू गावडे यांनी मांडली. नरसिंगरावांच्या रेंगाळलेल्या स्मारकाबाबत विष्णू पाटील यांनी चिंता व्यक्त केली. कृषी प्रदर्शन भरविण्याची मौलिक सूचना झि. नि. पाटील यांनी मांडली.

उपाध्यक्ष पोमाणा पाटील यांनी आभार मानले. यावेळी विठोबा गावडे, अल्लीसो मुल्ला, परशराम पाटील, गोपाळ गावडे, पुंडलिक पाटील, अभय देसाई, राजीव जाधव, जानबा चौगुले, रामचंद्र बेनके, दयानंद पाटील, विजयमाला पाटील, नारायण पाटील आदींसह संंचालक उपस्थित होते.

१५ टक्के पगारवाढ

संघाच्या यशात सभासद शेतकऱ्यांप्रमाणेच कर्मचाऱ्यांचेही योगदान आहे. त्यामुळे त्याची जाणीव ठेवून कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ अध्यक्ष राजेश पाटील यांनी जाहीर केली.

फोटो ओळी : हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या सभेत आमदार राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : २६०३२०२१-गड-०१