शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

रामनवमी साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रामनवमी मंदिरातील पुजारी व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. यानिमित्त अंबाबाई मंदिर आवारातील राम ...

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रामनवमी मंदिरातील पुजारी व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. यानिमित्त अंबाबाई मंदिर आवारातील राम मंदिरात सकाळी धार्मिक विधी व सायंकाळी पालखी सोहळा काढण्यात आला. यंदा कोरोनामुळे रथोत्सव रद्द करण्यात आला.

भगवान श्री रामाचा जन्मोत्सव सोहळा असलेल्या रामनवमीनिमित्त गुढीपाडव्यापासून नवरात्र सुरू होता. रामनवमीला जन्मकाळ सोहळा साजरा केला जातो. यानिमित्त आज (बुधवारी) सकाळी महाभिषेक झाला. त्यानंतर दुपारी १२ वाजता मंदिरात मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत जन्मकाळ-पाळणा झाला. सायंकाळी पालखी सोहळा झाल्याची माहिती पुजारी सुहास झुरळे, सुरेंद्र झुरळे व अनिल झुरळे यांनी दिली. मंगळवार पेठेतील श्रीराम मंदिरातही मोजक्याच महिलांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा झाला. सध्या कोरोनामुळे कडक संचारबंदी असल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला नाही.

--

फोटो नं २१०४२०२१-कोल-रामनवमी०१,०२

ओळ : रामनवमीनिमित्त बुधवारी कोल्हापुरातील मंगळवार पेठ येथील राम मंदिरात दुपारी जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त श्रींची मनोहारी पूजा बांधण्यात आली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--

---

---