शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जातीव्यवस्था नष्ट व्हावी

By admin | Updated: August 26, 2015 22:50 IST

जोगेंद्र कवाडे : मालवणात फुले, शाहू आंबेडकर विचारमंच कार्यक्रम

मालवण : आजही दलित समाजाचे चित्र धुसर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आशावादी बनविले. जातीय अन्याय होत आहे म्हणून समाजाने संघर्ष करणे थांबवू नये. बाबासाहेबांनी आकाशाला गवसणी घालण्याचे पंख दिले आहेत. देशात समता, एकात्मता प्रस्थापित झाली तर जात व वर्ण व्यवस्था समूळ नष्ट होईल. डॉ. बाबासाहेबांचे कार्य देशासाठी सन्मानाचे होते. जातीव्यवस्था नष्ट होऊन बाबासाहेबांच्या विचारांचे राज्य आल्यास आपला भारत देश महासत्ता बनेल, असे प्रतिपादन विधान परिषद आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केले. फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्यावतीने डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त येथील डॉ. श्रीधर कुडाळकर हायस्कूल सभागृहात मंगळवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रा. कवाडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. डी. बनसोडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद जाधव, शाहू, फुले विचारमंचचे अध्यक्ष रंजन तांबे, प्रा. खरात तसेच सचिव राजेंद्र कदम, सिद्धू जाधव, बबन मालवणकर, रवी मालवणकर, नरेश वायंगणकर, पुरुषोत्तम मालवणकर, श्रीकांत मालवणकर, कुडाळकर हायस्कूलच्या दर्शना गुळवे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर चव्हाण यांनी तर आभार सूर्यकांत कदम यांनी मानले. (प्रतिनिधी)...तर घराघरात बाबासाहेब घडतीलभारताची राज्यघटना देशात महान आहे. आपण ज्या देशात राहतो, त्या देशाच्या राज्य घटनेचा अभ्यास प्रत्येकाने केलाच पाहिजे. बाबासाहेबांनी घटनेत दलित समाजाच्या अगोदर ३४0 व्या कलमात ओबीसींना आरक्षण दिले. त्यानंतर ३४१ वे कलम दलितांच्या आरक्षणाचे लिहिले. आज देशाने बाबासाहेब ओळखणे गरजेचे आहे. महामानवाने देशातील हरएक व्यक्तीचा विचार करून घटना लिहिली. जेव्हा घटनेतील कर्तव्यांची जाणीव देशाला होईल तेव्हा घराघरात आंबेडकरांची पूजा होईल असे प्रा.कवाडे म्हणाले.दलितांनी चळवळ व्यापक बनवावीआज दलित समाज विखुरला जात असल्याची खंत व्यक्त केली. आज दलित चळवळीची बेटे तयार झाली आहेत. या बेटांचे एकत्रिकरण होणे काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना उद्धारासाठी संघर्षाची लढाई करणे शिकविले आहे. समाजाच्या हितासाठी लढणारी पिढी निर्माण करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे. निराशेला दफन करून एकजुटीने समाजासाठी एकत्र यायला पाहिजे, असेही प्रा. कवाडे म्हणाले.शिवाजी महाराजांचा इतिहास लपविला गेलाछत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक पाने आपल्यासमोर आलेली नाहीत. छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या अनेक गोष्टी समोर आलेल्याच नाहीत. ते रयतेचे राजा असले तरी त्यांना क्षुद्र ठरविण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबियांबद्दलही माहिती पुढे करण्यात आली नाही, हा इतिहास बाबासाहेब पुरंदरेनी का लपविला? असा सवालही कवाडे यांनी उपस्थित केला. यामुळे छत्रपतींचा संपूर्ण इतिहास नव्याने अभ्यासून आताच्या पिढीसमोर मांडण्याची वेळ आली आहे, असेही प्रा. कवाडे म्हणाले.देश जातीयवादी होतोय प्रा. कवाडे म्हणले, आज देश महासत्तेकडे वाटचाल करीत असताना देशात मात्र जातीयवाद फोफावत चालला आहे. माणूस दगड बनल्याने दगडाचे देव झाले. देशाची राज्यघटना बदलण्याचे वर्णवादी लोकांनी षड्यंत्र रचले होते. मात्र, संसदेत प्रा. कवाडे यांनी राज्यघटना बदलणाऱ्यांचे हात छाटून टाकू असे ठणकावले होते.