शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅफर’ आल्यास राष्ट्रवादीशी आघाडी

By admin | Updated: April 4, 2015 00:28 IST

पी. एन. पाटील : जिल्हा बँक निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना अर्ज भरण्याचे आवाहन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीत काँग्रेसची ताकदीने उतरण्याची तयारी आहे. राष्ट्रवादीकडून आघाडीबाबत जरूर विचार केला जाईल परंतु तोपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी केले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आज, शनिवारपासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे आवाहन केले आहे.सध्या गोकुळ व जिल्हा बँक या शिखर संस्थांची रणधुमाळी एकाचवेळी सुरू झाली आहे. ‘गोकुळ’च्या अर्ज माघारीच्या दिवशीच जिल्हा बँकेसाठीही अर्ज भरण्याचीही शेवटची मुदत आहे. ‘गोकुळ’मध्ये काँग्रेसची सत्ता आहे व जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे बहुमत होते. त्यामुळे राष्ट्रवादीने ‘गोकुळ’मध्ये हस्तक्षेप करायचा नाही व काँग्रेसने जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायचा, अशी चर्चा या दोन पक्षांतील नेत्यांत सुरू झाली आहे, परंतु ती अजून चर्चेच्याच टप्प्यावर आहे. तोपर्यंत ‘गोकुळ’मध्ये राष्ट्रवादीस जागा न देण्याचा निर्णय सत्तारुढ गटाचा झाला आहे. त्यामुळे हा पक्ष जिल्हा बँकेत नेमकी काय भूमिका घेतो, याबद्दल साशंकता असल्याने काँग्रेसने लढण्याची तयारी म्हणून कार्यकर्त्यांना अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहेत.या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पी. एन. पाटील म्हणाले,‘जिल्हा बँकेत दोन्ही काँग्रेस एकत्र येण्यासंबंधी काही प्रस्ताव आल्यास त्याचा जरूर विचार केला जाईल परंतु यासंदर्भातील चर्चा अजूनही वृत्तपत्रांतूनच सुरू आहे. राष्ट्रवादीकडून त्यासंबंधी ‘थेट आॅफर’ आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहेत. अर्ज दाखल झाल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून निवडणुकीत नक्की काय भूमिका घ्यायची याचा निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीकडून ‘आॅफर’ आल्यास त्यांच्यासोबत आघाडी करण्याची काँग्रेसची तयारी आहे.’सत्तेची सद्य:स्थिती..‘गोकुळ’मध्ये संचालकांच्या अठरा जागा आहेत; परंतु त्यामध्ये राष्ट्रवादीचा एकही संचालक नाही. तिथे एकतर्फी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. जिल्हा बँकेवर २००९ मध्ये प्रशासक नेमला तेव्हा त्यांच्याच ताब्यात बँकेची सत्ता होती. किंबहुना राष्ट्रवादीने गैरकारभार केल्यामुळेच बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याची तक्रार तेव्हा काँग्रेस करत होती. बँकेत काँग्रेसचेही त्यावेळी आठ-नऊ संचालक सत्तेत होते.