शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहनांचे ‘अवघड’ दुखणे!

By admin | Updated: August 26, 2015 00:36 IST

वाहतूक शाखेची डोळेझाक : आणखी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार का ?

प्रदीप शिंदे- कोल्हापूरअवजड वाहनांना वाहतुकीसाठी दुपारी साडेबारा ते साडेचार या वेळेव्यतिरिक्त शहरात प्रवेश करण्यास बंदी असतानासुद्धा वाहतूक शाखेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे ही अवजड वाहने शहरातून सर्रास फिरताना दिसतात. पुन्हा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वाहतूक शाखेस जाग येणार का, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. शहरातून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी दुपारी बारा ते चार ही वेळ नियोजित करण्यात आली आहे. मात्र, हा नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र सध्या शहरात पाहण्यास मिळते. अनेक अवजड वाहने केव्हाही शहराच्या मुख्य रस्त्यावरून ये-जा करताना दिसतात. वाढत्या अतिक्रमणाने मोठे रस्ते आधीच अरुंद झाले आहेत. त्यातच शहरातून अवजड वाहनांची वाहतूक बेलगामपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरून जावे लागते. शहरात या प्रकारामुळे अपघातांमध्ये तर वाढ होत आहेच; पण वाहतुकीस अडथळेही होत आहेत. एखाद्या वेळी दुचाकी वाहन पार्किंगमध्ये न लावल्यास त्यांच्यावर वाहतूक शाखेच्यावतीने तत्काळ कारवाई केली जाते. त्यांना ही अवजड वाहने कशी दिसत नाहीत, असा प्रश्न सामान्य लोकांना पडतो आहे. या जड वाहनांना कोणत्याच प्रकारे निर्बंध का लावले जात नाहीत, अशी विचारणा वाहनधारकांमधून होत आहे.वाहतुकीचे नियोजन फक्त रस्ता सुरक्षा अभियानापुरतेच न करता कायमपणे राबविणे गरजेचे आहे. याची जबाबदारी महापालिका, शहर वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागांची असून, त्यांनी या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. माफक दंडामुळे मनमानीशहरात प्रवेश करण्यासाठी ठरावीक वेळ दिली असताना अनेक अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू असण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यांच्यावर प्रवेशबंदीचे उल्लंघन म्हणून कारवाई करताना फक्त शंभर रुपयांची पावती केली जाते. या रकमेत वाढ केल्यास या वाहतुकीस नक्कीच आळा बसेल. तसेच अशी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी धडक मोहीम राबविणे गरजेचे आहे. त्यामुळे जीवघेणे अपघात तरी कमी होतील. शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहने ने-आण करण्यास बंदी आहे. शहरात फक्त दुपारी साडेबार ते साडेचार या वेळेत अवजड वाहन प्रवेश करण्यास परवानगी आहे. तसेच सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदीचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे प्रलंबित आहे. मात्र, याला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना प्रवेश केल्याबद्दल अनेकवेळा आम्ही कारवाई केली आहे.- आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा