शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी पालिकेचे खड्डे बुजविण्याऐवजी बॅरिकेडस्‌ लावून संगोपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील मुख्य वर्दळीच्या मार्गांवर काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनला गळती लागली आहे. गेल्या महिनाभरापासून अशा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील मुख्य वर्दळीच्या मार्गांवर काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनला गळती लागली आहे. गेल्या महिनाभरापासून अशा खड्ड्यांभोवती बॅरिकेडस् लावून नगरपालिकेने वाहनधारकांना धोकादायक खड्ड्यांची सूचना दिली आहे; परंतु ते काम पूर्ण करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली जात नाही. त्यामुळे हे नगरपालिकेचे पाळीव खड्डे आहेत का? बुजविण्याऐवजी त्यांचे संगोपन केले जात आहे का, असे संतप्त सवाल वाहनधारकांतून व्यक्त होत आहेत.

शहरातील संभाजी चौक ते बसस्थानक या मार्गावर प्रांत कार्यालय चौकात मध्यभागी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्याठिकाणी प्लास्टिकची बॅरिकेडस् लावण्यात आली आहेत. छत्रपती शाहू पुतळा ते तीन बत्तीचौक या मुख्य मार्गावरही मधोमध मोठा खड्डा पडला आहे. तेथे मोठे लोखंडी बॅरिकेडस् लावून ठेवले आहेत, तर शहापूरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरही मोठी खुदाई करून तो खड्डा तसाच सोडला आहे. त्याच्याभोवती मोठमोठे बॅरिकेडस् लावून ठेवले आहेत. या सर्व ठिकाणांहून वाहनधारकांना अडथळ्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. थोडी नजरचुकी झाल्यास बॅरिकेडस्‌ला धडकून अपघात होण्याची शक्यता आहे. अशी धोकादायक परिस्थिती असतानाही नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. (फोटो)

१२०१२०२१-आयसीएच-०५

प्रांत कार्यालय चौक

१२०१२०२१- आयसीएच-०६

शहापूर रोड

१२०१२०२१- आयसीएच-०७

शाहू पुतळा रोड (सर्व छाया : उत्तम पाटील)