शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमधील गाळे लिलावाची प्रक्रिया रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर गडहिंग्लजमधील खाऊ गल्लीतील ११ गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया रद्द करण्याचा ठराव बुधवारी झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर गडहिंग्लजमधील खाऊ गल्लीतील ११ गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया रद्द करण्याचा ठराव बुधवारी झालेल्या बांधकाम समितीच्या सभेत करण्यात आला. याबाबतची निविदा प्रक्रिया चुकीची झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती हंबीरराव पाटील होते. सभापती पाटील आणि विजय भोजे यांच्यात यावेळी निधी वितरणावरून शाब्दिक चकमक उडाली.

गडहिंग्लज बाजारपेठेतच जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये ११ गाळे उभारण्यात आले आहेत. हे गाळे बचत गटांना द्यावेत असा आधी ठराव झाला होता; परंतु याबाबतची ई-निविदा उघडल्यानंतर एकाच व्यक्तीने पाच, दुसऱ्या व्यक्तीने ३ आणि तिसऱ्या व्यक्तीने ३ अशा निविदा भरल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात येथील गाळ्यांना पाच, सहा हजार भाडे असताना या सर्वांनी ४८०० भाड्याची निविदा भरली आहे. एकाच व्यक्तीला पाच गाळे कसे देता अशी विचारणा सदस्यांनी केली. अखेर जोरदार चर्चेनंतर ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. प्रसाद खोबरे यांच्यासह सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.

ग्रामपंचायतींना नेट जोडण्याकामी केबल टाकण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. मात्र खुदाई केल्याबद्दलची भरपाई जिल्हा परिषदेला मिळत नसल्याची वस्तुस्थिती यावेळी मांडण्यात आली. तसेच रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याची जबाबदारीही संबंधित कंपन्या पार पाडत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असाही ठराव यावेळी करण्यात आला. यावेळी विजया पाटील, अर्जुन आबिटकर, अमर पाटील उपस्थित होते.

चौकट

विषय न्यायालयात जाण्याची शक्यता

निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर ज्यांनी ती भरली आहे, त्यांच्या नावांना सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. असे असताना महाराष्ट्र शासनाकडे केवळ प्रक्रियेचा भाग म्हणून परवानगी मागितली आहे. असे असताना ही प्रक्रियाच रद्द करण्याने न्यायालयात जाण्याला वाव करून देण्याचा प्रकार असल्याची चर्चा आहे.