शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

माणसाने ओलांडली क्रौर्याची सीमा; रस्त्याकडेची झाडे जाळण्याचा प्रकार, कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:33 IST

वनविभाग, ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष

आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : माणसांनी क्रौर्याची सीमा ओलांडल्याचे उदाहरण गुरुवारी (दि. १२) कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील गगनबावडा तालुक्यातील लोंघे या गावी दिसले. या मार्गावरील शिल्लक राहिलेली झाडे पेटवून देण्याचा अनोखा फंडा अज्ञात व्यक्तींना सुरू केला आहे. वनविभागाचे मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील अनेक जुनी आणि अवाढव्य झाडे निर्दयपणे तोडून टाकली. आता याच रस्त्याच्या दुतर्फा असलेली शिल्लक झाडेही कायद्याने तोडू शकत नसल्याने पळवाट काढून काही अज्ञात व्यक्ती ती पेटवून देऊ लागली आहेत. या जागेवर एखादी टपरी टाकण्यासाठी ही जिवंत झाडे नष्ट करण्याचा अनोखा फंडा अलीकडे दिसून येऊ लागला आहे. हाच फंडा वापरून यापूर्वी कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावरील वडासह अवाढव्य झाडेही नष्ट करण्याचा प्रकार घडला होता. याकडेही वनविभागाकडून दुर्लक्ष झाले होते.

कायद्याने ही झाडे नष्ट केल्यास पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड अथवा कारावासाची कारवाई होईल ही भीती असल्याने या झाडांच्या खोडाशी वाळलेला कचरा पेटवून देऊन हे झाडच जाळण्याचा अघोरी प्रकार गगनबावडा तालुक्यात होऊ लागला आहे. अशा प्रकारची अनेक झाडे अर्धवट जळालेल्या तर काही झाडे पूर्णपणे जाळण्यात या व्यक्ती यशस्वी ठरल्या आहेत.

एकदा का ही झाडे जळाल्यानंतर वाळून गेली की ती काढून टाकण्याशिवाय पर्याय रहात नाही. ही झाडे आपल्या व्यथा सांगू शकत नसले तरी वनविभाग आणि ज्या हद्दीत ही झाडे आहेत, त्या गावच्या ग्रामपंचायतीला जबाबदार धरल्याशिवाय ही झाडे वाचणार नाहीत. यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव करुन जबाबदारी निश्चित केली पाहिजेत आणि वनविभागानेही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

ही जिवंत झाडे जाळणे माणसांच्या क्रोर्याची परिसीमा आहे. या झाडांची जबाबदारी वनविभाग आणि ग्रामपंचायतीनेच घेतली पाहिजेत. त्याविरोधात कारवाई केली गेली पाहिजे. - मधुकर बाचूळकर, वनस्पती तज्ज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : Humanity crosses limits: Trees torched on Kolhapur-Gaganbawda road.

Web Summary : Trees are being burned along the Kolhapur-Gaganbawda road after road widening. This destruction allows illegal construction. The forest department is allegedly neglecting the issue. Gram panchayats and the forest department must take responsibility.