मंगळवार (१९) सायंकाळी सहाच्या सुमारास धनगरवाड्याजवळील मालकी क्षेत्रात चरत असलेल्या पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये पोलीस पाटील सखाराम फोंडे यांची गाय किरकोळ जखमी झाली आहे.
फोंडे यांच्या आईने आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. वनविभागानजीकच्या शेतकऱ्यांनी पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी.
शेळ्या, गाय, म्हैस वनक्षेत्रात चरण्यास सोडू नये व आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पाटणे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी केले आहे.
गेल्या आठवड्यात बांद्राई धनगरवाडा येथेही बिबट्याने एका म्हैशीला जखमी केलेले आहे. वाळलेले गवत व कठिण जमीन यामुळे बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आले नाहीत.
------------------------
* फोटो ओळी : पार्ले (ता. चंदगड) येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या म्हैशीची पाहणी करताना वनक्षेत्रपाल दत्ता पाटील व शेतकरी.
क्रमांक : २००१२०२१-गड-०३